सातारा दि. 21 (जि.मा.का.) : सन 2020 ते 2025 या कालावधीतील सरपंच पदांचा आरक्षणाचा कालावधी दि. 1 एप्रिल 2020 ते दि. मार्च 2025 असा राहिल . सातारा जिल्ह्यातील बिगरअनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची प्रवर्ग निहाय व जिल्हा निहाय संख्या निश्चित करण्यात आलेली असून मुंबई ग्रामपंचायत ( सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम 2 अ मधील पोट नियम (3) (अ)(ब) व 4 अन्वेय प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराद्वारे जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडून , याद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूची मध्ये दर्शविलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग यातील महिलासह ) यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट करण्यात येत आहेत.
*सातारा तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 196* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 21 महिला 11, खुला 10 अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, सोडती द्वारे 1 पद निश्चित करणे नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 53, महिला 27, खुला 26,सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 121, महिला61, खुला 60, एकुण सरपंचांची पदे 196 आहेत.
*कोरेगांव तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 142* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 13, महिला 7, खुला 6, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1 महिला 1, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 38, महिला 19, खुला 19, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 90, महिला 45, खुला 45, एकुण सरपंचांची पदे 142 आहेत.
*जावली तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 125*अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 9, महिला 5, खुला 4, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 2, महिला 1, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 34, महिला 17, खुला 17, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 80, महिला 40, खुला 40, एकुण सरपंचांची पदे 125 आहेत.
*वाई तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 99* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 9, महिला 5, खुला 4, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 2, महिला 1, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 27, महिला 14,, खुला 13, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 61, महिला 31, खुला 30, एकुण सरपंचांची पदे 99 आहेत
*महाबळेश्वर तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 77*अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 7, महिला 4, खुला 3, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 5, महिला 3, खुला 2, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 21, महिला 11,, खुला 10, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 44, महिला 22, खुला 22, एकुण सरपंचांची पदे 77आहेत
*खंडाळा तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 63* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 6, महिला 3, खुला 3, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 17, महिला 9, खुला 8, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 40, महिला 20, खुला 20, एकुण सरपंचांची पदे 63 आहेत
*फलटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 131* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 10, खुला 9, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, सोडती द्वारे 1 पद निश्चित करणे. नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 35, महिला 18, खुला 17, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 76, महिला 38, खुला 38, एकुण सरपंचांची पदे 131 आहेत
*माण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 95 *अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 12, महिला 6, खुला 6, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 26, महिला 13, खुला 13, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 57, महिला 29, खुला 28, एकुण सरपंचांची पदे 95 आहेत
*खटाव तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 133* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 13, महिला 7, खुला 6, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 36, महिला 18, खुला 18, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 84, महिला 42, खुला 42, एकुण सरपंचांची पदे 133आहेत.
*कराड तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 200* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 25, महिला 13, खुला 12, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 0, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 54, महिला 27, खुला 27, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 120, महिला 60, खुला 60, एकुण सरपंचांची पदे 200 आहेत.
*पाटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 234* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 20, महिला 10, खुला 10, अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 0, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची पदे एकूण 63, महिला 32, खुला 31, सर्वसाधारण प्रवर्ग सरपंचांची पदे एकुण 150, महिला 75, खुला 75, एकुण सरपंचांची पदे 234आहेत. यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट करीत आहे. असे जिल्हाधिकारी, शेखर सिंह यांनी कळविले ओह.