भारतीय सैन्य दिवस बारामतीमध्ये साजरा

बारामती: शुक्रवार दि.१५/१/२०२१ रोजी बारामतीमध्ये भिगवण चौक येथे भारतीय सैन्य दिवस साजरा करण्यात आला . यावेळी भिगवन चौक येथील स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अतिरेकी कारवाया मध्ये शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली . उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांनी सैनिकांना पाठविलेल्या शुभेच्छा वाचून दाखवण्यात आल्या.
या वेळी प्रांत श्री दादासाहेब कांबळे
उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक व तहसीलदार हनुमंत पाटील, पुर्ननिर्वाचीत सैनिक संघटनेचे दिपक पाटील, क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे , जय जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निंबाळकर
कॅप्टन रविंद्र लडकत तसेच आजी माजी सैनिक उपस्थित होते भारतीय सैनिक यांचा पराक्रम व विविध युद्ध या मधील सैनिकांनी दाखवलेला अतुलनीय पराक्रम या बदल माहिती देण्यात आली.
फोटो ओळ:भिगवण चौक येथे सैन्य दिवस साजरा करताना मान्यवर
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!