बारामती: राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती निमित्ताने घाडगेवाडी (ता.बारामती) येथे राजमाता जिजाऊ चौकात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघाचे बारामती तालुका अध्यक्ष प्रा.गोविंद वाघ सर, संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, तालुका संघटक विशाल भगत, संभाजी ब्रिगेड उद्योजक कक्षाचे तालुका उपाध्यक्ष अजित चव्हाण, घाडगेवाडी शाखा खजिनदार अभिजीत बळीप, शरदराव चव्हाण, रणजित तुपे, अक्षय चव्हाण, नितीन तुपे, रविंद्र साबळे, प्रशांत काकडे, आबासो चव्हाण, सोमनाथ वाघ, समीर भांडवलकर, किरण साबळे, संकेत कोकरे, रोहित साबळे, रोहन चव्हाण, आदेश तुपे आदींच्या उपस्थिती मध्ये जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.