फलटण शेजारी मोठ्याने विस्तारणार्या ग्रामपंचायत म्हणुन कोळकी गावाची ओळख आहे. कोळकी गावाचा गेल्या काही वर्षात झपाट्याने विकास झालेला आहे.
कोळकी ग्रामपंचायत गेले कित्येक वर्षे विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कोळकी गावचा विकास झालेला आहे.
आगामी काळामध्ये कोळकी गावचा विकास असाच अखंडितरित्या सुरू ठेवण्यासाठी प्रभाग क्रमांक ६ मधून तुषार नाईक निंबाळकर यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे यांनी केलेले आहे.
सध्या फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या मध्ये फलटण शहराच्या शेजारी असणारी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे कोळकी होय.
कोळकी ग्रामपंचायीच्या वॉर्ड नंबर ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तुषार नाईक निंबाळकर, तेजश्री अजित मुळीक व राधिका अशोक पखाले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
आज पर्यंत कोळकी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच वर्चस्व राहिलेले आहे. आगामी काळामध्ये कोळकी ग्रामपंचात हद्दीतील विकासकामे अखंडित सुरू ठेवण्यासाठी कोळकी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असेही दत्तोपंत शिंदे यांनी स्पष्ट केले.
❤️👑राजे ग्रुप फलटण.👑❤️