बारामती तालुका संपादक व पत्रकार सुरक्षा संघाची कार्यकारणी जाहीर..
अध्यक्षपदी योगेश नामदेवराव नालंदे यांची निवड.
बारामती :-बारामती तालुका संपादक व पत्रकार सुरक्षा संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी साप्ताहिक शेतकरी योद्धाचे संपादक योगेश नामदेव नालंदे यांची एकमताने निवड करण्यात आली . झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या आदेशान्वये व संघाच्या अध्यक्ष व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली .
या मध्ये अध्यक्षपदी – योगेश नालंदे ( सा.शेतकरी योद्धा ), उपाध्यक्ष – स्वप्निल कांबळे ( सा.बारामती समाचार ), उपाध्यक्ष – उमेश दुबे ( पा.बारामतीचा आवाज ), कार्याध्यक्ष – विकास कोकरे ( दै.जनमत ), सचिव – निलेश जाधव ( सा.सत्य समिक्षा ), सहसचिव – शिलभद्र भोसले ( सा.भारतीय नायक ), खजिनदार – सुरज देवकाते ( दै.राष्ट्र सह्याद्री ), कार्यकारणी सदस्य – तैनुर शेख ( सा.वतन की लकीर ), सुनिल शिंदे ( सा.बहुजन हितार्थ ), तानाजी पाथरकर ( सा.निर्भिड बारामती ), नवनाथ बोरकर ( जय महाराष्ट्र न्यूज ), साधु बल्लाळ ( सा.बारामतीचा सम्राट ), मन्सूर शेख ( बारामती टाईम्स ), दीपक पडकर ( दै.प्रभात ), तुषार ओहोळ ( सा.बहुजन टायगर ), विराज शिंदे ( सा.बारामतीचे राजकारण ), सिकंदर शेख ( महाराष्ट्र न्यूज ), राहुल कांबळे ( सा.बारामती संघर्ष ), संदीप साबळे ( सा.बारामतीचे नेतृत्व ), यांची निवड करण्यात आली,
यावेळी बारामती तालुक्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेची स्थापना करण्यात आली असून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन लढा उभारणार असल्यासाचे नवनिर्वाचित संपादक पत्रकार सुरक्षा संघाचे अध्यक्ष योगेश नालंदे यांनी सांगितले. मागील काही कालावधीमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या काही पत्रकारांवर अन्याय देखील झाला अशा गोष्टी वारंवार घडू नयेत यासाठी सर्वांनी एक होऊन संघटन मजबूत करावे असे मत देखील नालंदे यांनी व्यक्त केले. बारामतीसह राज्यात अनेक संघटना झाल्या आहेत. मात्र या संघटनेमार्फत पत्रकारांचे विविध प्रश्न वरिष्ठ पातळीवर कसे मांडण्यात येतील याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे मत उपाध्यक्ष स्वप्निल कांबळे आणि उमेश दुबे यांनी व्यक्त केले. वैराट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली राहून काम करणार असल्याचे देखील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
________________________________