फलटण तालुक्यातील निंभोरे गावामध्ये विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची सत्ता स्थापन होऊन निंभोरे गावात नक्कीच परिवर्तन घडवणार असल्याचे मत मुकुंद रणवरे यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यामध्ये विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्वांगिण विकास केलेला आहे. फलटण तालुक्याचे मूलभूत प्रश्न श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी सोडवलेले आहेत. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये असलेल्या एमआयडीसी बरोबरच अतिरिक्त एमआयडीसी नांदल येथे मंजूर झालेली आहे.
त्यामाध्यमातून अनेक मोठे प्रकल्प तालुक्यात नियोजित आहेत. यातून तालुक्याच्या विकासाला आणखी गती प्राप्त होणार आहे. त्यामुळे निंभोरे गावचा विकास साधण्यासाठी निंभोरे ग्रामस्थ आत्ताच्या ग्रामपंचायत निवडणूकीत ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीच्याच उमेदवारांना आपली पसंती दर्शवतील, असा विश्वासही यावेळी मुकुंद आण्णासाहेब रणवरे (काका) यांनी व्यक्त केला.
❤️👑राजे ग्रुप फलटण.👑❤️