जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
“श्री योगीराज इंडस्ट्रीज”बारामती यांच्या सण 2021 दिनदर्शिकेचे प्रकाशन कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री योगीराज इंडस्ट्रीज चे मालक अरुण म्हसवडे हे एक सामान्य शेतकरी कुटुंब ते एक यशस्वी उद्योजक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा व तरुण युवकांना प्रेरणा देणारा आहे. शुगरकेन हारवेस्टर इन्फईल्डर, ट्रॅक्टर मौनटेड लोडर्स, डोझर्स,बॅको, तसेच ट्रॅक्टर ट्रेलर्स उत्पादित करतात.महाराष्ट्र तसेच कर्नाटक या राज्यातही त्यांचे ग्राहक आहेत. शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीत तसेच दर्जदार सेवा देण्यात “योगीराज इंडस्ट्रीज” बारामती चा मोठा वाटा असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
उत्तम दर्जा व गुणवत्ता आणि कमी किंमत हे वैशिष्ट्य असल्याचे अरुण म्हसवडे यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.सेल्स व मार्केटिंग मॅनेजर श्री.गणेश भांड व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्तीत होते.