मुंबई : अंधेरी पूर्व पश्चिम द्रुतगती मार्ग ते दहिसर आनंद नगर पर्यंत तसेच डी एन नगर ते दहिसर मेट्रोचे काम सध्या वेगाने सुरू आहे. लॉक डाऊनच्या काळातही याठिकाणी अनेक गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले होते. आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहिसर येथील मेट्रोच्या कामाची पाहणी करत याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुरू असलेल्या कामाची आराखडा द्वारे माहिती दिली. याप्रसंगी म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, आमदार विभाग प्रमुख विलास पोतनीस, आ. प्रकाश सुर्वे, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच एमएमआरडीए व मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.