मा. सातारा जि.प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर याच्या हस्ते चषक स्विकारताना विजेता मावळ संघ
मा. सातारा जि.प. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर याच्या हस्ते चषक स्विकारताना उप – विजेता प्रिझम स्टार क्रिकेट क्लब, वाठार निंबाळकर संघ
फलटण टुडे प्रतिनिधी :- प्रिझम स्टार क्लब वाठार निंबाळकर आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 20 20 टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यत वाठार निंबाळकर येथे केले होते.
अंतिम सामन्यात मावळ विरुद्ध प्रिझम स्टार क्रिकेट क्लब, वाठार निंबाळकर सामना रंगला यामध्ये “चॅम्पियन ट्रॉफी 2020” चषक व 51 हजार रुपये बक्षीस चा मानकरी मावळ क्रिकेट क्लब हा संघ विजेता ठरला तर उपविजेता संघ प्रिझम स्टार क्रिकेट क्लब, वाठार निंबाळकर उपविजेत्या संघास चषक व 21 हजार रुपये असे पारितोषिक देण्यात आले. बक्षीस वितरण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,जे. के. नाईक निंबाळकर,राजेंद्र नाईक निंबाळकर, सुर्यादित्य नाईक निंबाळकर,कल्याण निंबाळकर(पप्पू), राजाभाऊ निंबाळकर,सरपंच शारदाताई भोईटे,उपसरपंच आनंदीबाई तरटे,सदस्य जयश्री बनकर, अमर नाईक निंबाळकर, सचिन कुदळे, माजी उपसरपंच शेखर निंबाळकर, विकास तरटे, पोलीस पाटील दत्तात्रय ढोक, नंदु (भाऊ) नाळे हे उपस्थित होते.
अमोल माने, सूरज घोलप, भीमराव भंडलकर, सागर खुडे, सूनील मदने आप्पा भंडलकर व गावातील सर्व तरूणांनी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.या सामन्यासाठी सत्यजित नाईक निंबाळकर, राजेंद्र नाईक निंबाळकर, दिपक माने व युवा उद्योजक कल्याण निंबाळकर, संतोष माने, अरुण पन्हाळे,सतिश निंबाळकर, सुरेश मोहिते, अजित जगताप,संतोष मुळीक यांचे विशेष सहकार्य लाभले.