जळोची : रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान करा असे आव्हान शासनाने करण्याची गरज न पडता युवकांनी रक्तदान करावे विविध संस्थांनी रक्तदान शिबिरे आयोजित करावे व रक्तदान ही चळवळ होणे साठी प्रत्यन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शरयु फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले.
खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एमआयडीसी येथील अजितदादा युथ फौंडेशन व आदित्य इंटरनॅशनल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शर्मिला पवार बोलत होत्या.या वेळी राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,युवक चे तालुकाध्यक्ष राहुल वाबळे,रुई च्या नगरसेविका सुरेखा चौधर,दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप,रुई चे माजी सरपंच मच्छिंद्र चौधर, बारामती बँकेचे उपाध्यक्ष अविनाश लगड,
प्रताप पागळे, अनिल काटे,नानासो थोरात,राहुल घुले,महादेव कचरे,सरदार साळुंके आदी मान्यवर उपस्तीत होते. आदित्य इंटरनॅशनल स्कुल व अजितदादा युथ फौंडेशन चे कार्य कौतुकास्पद असून सामाजिक भान व जाण जपत रक्तदान शिबिर घेऊन युवकांना प्रोत्साहन करीत शासनाच्या उपक्रमास सहकार्य करीत असल्याचे शर्मिला पवार यांनी सांगितले.
उत्कृष्ट शिक्षण,शिस्त व रक्तदान च्या माध्यमातून आदित्य स्कुल सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे प्रास्तविक मध्ये प्रो सुजित वाबळे यांनी सांगितले या प्रसंगी नीट,जेईई व सीईटि मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व रक्तदान साठी सहकार्य करणाऱ्या महिलांचा शर्मिला पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अजितदादा युथ फौंडेशन चे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड,उपाध्यक्ष दत्ता माने,सचिव सचिन घाडगे व इतर सहकारी यांनी उपस्तीताचे स्वागत केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळेपाटील यांनी केले.
या प्रसंगी 588 बाटल्या रक्त संचलित करण्यात आले.