सेंद्रिय पद्दतीने प्रत्येक घराजवळ परस बागेची निर्मिती केल्यास कमी खर्चात ताजा,सकस आणि विषमुक्त भाजीपाला कुटूंबास उपलब्ध होणे सहज शक्य

बावडा (ता.खंडाळा):सेंद्रिय पद्दतीने प्रत्येक घराजवळ परस बागेची निर्मिती केल्यास कमी खर्चात ताजा,सकस आणि विषमुक्त भाजीपाला कुटूंबास उपलब्ध होणे सहज शक्य आहे असे मत सातारा जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी कृषी व पशुसवंधन समिती सभापती मनोजभाऊ पवार यांनी व्यक्त केले.
मानदेशी फाऊन्डेशन च्या वतीने महिलांसाठी आयोजित कृषि विषयक आणि पोषक परसबाग स्थापना प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. श्री.पवार पुढे म्हणाले की, ताज्या आणि स्वच्छ भाजीपाल्याच्या माध्यमातून आहारात आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे योग्य प्रमाणात मिळाल्याने आरोग्य संपन्न कुटूंबे तयार होऊन प्रकृती स्वास्थ लाभेल.
यावेळी कृषि तज्ञ योगेश भोंगळे यांनी पोषक- परसबागेची स्थापना कशी करावी या विषयी सविस्तर मार्गदर्शन करताना परंपरागत शेती पद्दतीने भाजीपाल्याच्या स्थानिक किंवा देशी वाणांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्याने लागवड केल्यास किड-रोगांचे प्रमाण कमी होऊन कमी खर्चात चवदार भाजीपाला उपलबध होऊन जास्तीचा भाजीपाला बाजारात विकून अधिकचे उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे असे सांगीतले.
सदरच्या प्रशिक्षणाचे आयोजन मानदेशी फाउन्डेशन च्या  प्रोग्राम डायरेक्टर सौ.राजश्री रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.रंजना ज्ञानेश्वर खंडाळकर यांच्या घराजवळील शेतावर क्षेत्रीय अधिकारी,कार्यक्रम समन्वयक सौ.विभाली क्षीरसागर यांनी केले होते. 
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सी.आर.पी.सौ. उज्वला तानाजी खोमणे यांनी विषेश परिश्रम घेतले.त्या यावेळी म्हणाल्या की, बावडा गावात बचत गटातील महिलांच्या सहभागातून पंधरा परस बागांची ऊभारणी करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या प्रसंगी बचत गटातील महिला सदस्यांसह प्रगतीशील शेतकरी विठ्ठल धापते, झानेश्वर खंडाळकर नानासो धापते आदि उपस्थीत होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!