फलटण(प्रतिनिधी)– फलटण शहरात माणुसकीच्या भावनेतून काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी सुरू केलेला “माणुसकीची भिंत”हा उपक्रम माणुसकी जपणारा आणि गोर गरिबांना आधार देणारा उपक्रम असून जनतेने या उपक्रमास भरभरून सहकार्य करावे असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले
माणूसकीची भिंत हा उपक्रम माणूसकी जपणारा आणि गोर गरिबांना आधार देणारा : प्रसाद काटकर
फलटण शहरातील महात्मा फुले चौकामध्ये “माणुसकीची भिंत” नको असेल ते द्या,पाहिजे ते घेऊन जावा हा उपक्रम काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी सुरू केला असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी प्रसाद काटकर बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर,जिल्हा परिषद फलटण उपविभागचे कार्यकारी अभियंता सुनील गरुड,नगरसेवक अशोकराव जाधव,अनुप शहा,मिलिंद नेवसे,दादासाहेब चोरमले, माऊली सावन्त आदी उपस्थित होते
फलटण तालुक्यात सामाजिक भान ठेवून चांगले समाजकार्य करणारी मंडळी एकत्र येऊन कोरोनाच्या संकट काळात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे सध्या थंडी सुरू असून गोरगरिबांना माणुसकीची भिंत माध्यमातून उबदार कपडे,अंथरून पांघरून मोफत मिळनार आहेत ज्यांच्याकडे देण्याची दानत आहे त्यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन प्रसाद काटकर यांनी केले
माणुसकीची भिंत या उपक्रमाची देखभाल करणारे अमित मठपती यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर आणि नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.या उपक्रमास पहिल्याच दिवशी प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला अनेकांनी सढळ हाताने मदत केली
माणुसकी भिंत हा सामाजिक उपक्रम महात्मा फुले चौक येथे गोरगरीब जनतेसाठी सुरू करण्यात आला आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत हा उपक्रम 6 डिसेंबर पर्यंत चालणार आहे ज्यांना कपडे,उबदार पांघरून ,जीवणाश्यक वस्तू यांची गरज आहे त्यांनी घेऊन जावे तसेच दानशूर व्यक्तींनी या उपक्रमास मदत करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे