फलटण :आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दर महिन्याला इ.3 री ते 15 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा आयोजित केली जाणार आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून सदर उपक्रम घेतला जाणार आहे.यामध्ये दर महिन्याच्या दिनविशेष यावर आधारित काही प्रश्न पर्याय सहित विचारले जाणार आहेत. त्याची उत्तरे सोडवल्यानंतर ईमेलवर ऑनलाइन आकर्षक प्रमाणपत्र मिळणार आहे.प्रश्नावलीची लिंक दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपणास व्हाट्सअप ग्रुपवरती पाठवण्यात येईल.सदर प्रश्नावलीचे प्रश्न जावली तालुक्यातील पदवीधर शिक्षक व शिष्यवृत्तीचे तज्ञ मार्गदर्शक आदरणीय श्री.नितीन जाधव सर हे काढणार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 1000 प्रश्नांची निर्मिती केली आहे तसेच या उपक्रमाची सांगता 12 महिन्यानंतर एक ऑफलाईन किंवा ऑनलाईन परीक्षा घेवून केली जाईल व त्याची नोंदणी करून स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेता येईल. त्यावेळेस आकर्षक बक्षीस देण्याचे नियोजन केले जाईल,असे मत आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व उपक्रमशील शिक्षक श्री.गणेश तांबे यांनी व्यक्त केले आहे.
सुंदर उपक्रमाचे आयोजन केले आहे.या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा ❗
उपक्रमाची सुंदर संकल्पना…उपक्रमास खूप खूप शुभेच्छा…!!!
छान उपक्रम. स्पर्धा परीक्षा तयारी उत्तम होईल. धन्यवाद तांबे सर.