ई एस आय साठी बैठक मध्ये बारामती मधील कामगार प्रतिनिधी (छाया अनिल सावळेपाटील)
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
राज्य शासनाची ई एस आय सेवा (राज्य कामगार विमा) कामगारांसाठी त्वरित सुरू करावी अशी मागणी बारामती एमआयडीसी मधील कामगार नेत्यांनी केली आहे.
ई एस आय सेवे साठी रुग्णालय बारामती मध्ये सुरू करावेत व शासनाच्या कामगार विभागाच्या इतर सेवा सुरू होणे साठी शुक्रवार दि.27 नोव्हेंबर रोजी बैठक चे आयोजन करण्यात आले होते या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश कामगार सेल अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, श्रायबर डायनामिक्स डेअरी प्रा लिमिटेड बारामती चे अध्यक्ष नाना साहेब थोरात, सुयश अॅटो प्रा. लि. भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस पोपट घुले, इमसोफर युनियन चे अध्यक्ष बाळासाहेब ढेरे, महेश काटे, पियाजो व्हॅइकल युनियन चे तानाजी खराडे , अशोक इंगळे आदी कामगार नेते उपस्थित होते.
कामगारांच्या पगारातील 1% रक्कम दरमहा कट होते व शासनाकडून 3% असे एकूण 4% रक्कम ईएस एस आय साठी घेतले जातात. रुपये 21 हजार च्या आत मासिक पगार असणाऱ्या कामगारांना ई एस आय सेवा मिळणे कायद्याने बंधनकारक आहे तरीही बारामती मध्ये सेवा मिळत नाही. कामगारांना
कोणत्याही आरोग्य सुविधा बारामती च्या कोणत्याही हॉस्पिटल मध्ये मिळत नाही त्यामुळे कामगारांना नाइलाजाने खाजगी हॉस्पिटल मध्ये भरमसाठ रक्कम भरून स्वतःला व कुटूंबियांना आरोग्यासाठी जावे लागते त्याच प्रमाणे कामगार विभागाच्या इतर सेवा व सुविधा सुद्धा बारामती मध्ये मिळत नाही बारामती इंदापूर पुरंदर दौंड तालुक्यातील विविध कंपन्या मध्ये कार्यरत असणाऱ्या कामगारांना अद्याप पर्यंत ई एस आय च्या सुविधा मिळाल्या नाहीत.बारामती शहरा मधील एखाद्या हॉस्पिटल ची शासनाने करार करून सदर सेवा सुरू करावी या साठी उपमुख्यमंत्री अजित पवार व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून कामगारांना न्याय देण्यासाठी प्रत्यन करणार असल्याचे बैठक मध्ये ठरविण्यात आले.
आभार पोपट घुले यांनी मानले