सातारा दि.26 (जि.मा.का): ‘संविधान दिन‘ आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने भारतीय संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी संविधानाचे प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते