प्रार्थना, धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या गर्दीला तिथल्या व्यवस्थापणाने मास्क आणि सुरक्षित अंतर राखण्याचा आग्रह करावा – जिल्हाधिकारी शेखर सिंह



सातारा दि.25 (जिमाका):  राज्य शासनाने प्रार्थना / धार्मिक स्थळे उघडण्यास मान्यता दिली आहे. आता ते स्थळे खुली झाली आहेत. या धार्मिक  स्थळांमध्ये गर्दी दिसत आहे ही गर्दी होणार नाही याची दक्षता देवस्थान प्रमुख, ट्रस्टने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
शासनाने धार्मिक स्थळे खुली केलेली आहेत, परंतु काही धार्मिक स्थळांमध्ये शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केले जात नाही. धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन धार्मिक स्थळांमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाने मास्कचा वापर केला पाहिजे, गर्दी होणार नाही याची खरबदारी घेऊन सुरक्षित अंतर राखले पाहिजे त्याचबरोबर धार्मिक स्थळाचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. धार्मिक स्थळांमधून कोरोना संसर्ग वाढू नये हा प्रशासनाचा हेतू आहे. धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होणार नाही याची जबाबदारी संबंधित ट्रस्टची, तेथील प्रमुखांची असणार आहे तरी धार्मिक स्थळांच्या ट्रस्टनी, प्रमुखांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

शाळा प्रमुखांनी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी लक्ष घालावे

राज्य शासनाच्या सुचनेनुसार 23 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील 9, 10, 11 व 12 वीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील 10 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये जे पॉझिटिव्ह आढळले आहेत अशांना कामावर न येण्याचे सांगितले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. जे निगेटिव्ह  आहेत असे शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी हजर झाले आहेत.
आता शाळा सुरु झाल्या आहेत विद्यार्थ्यांनीही शासनाने दिलेले नियम पाळले पाहिजे हे नियम आपल्या हिताचे असून यामध्ये तुम्ही मास्कचा योग्य तो वापर, शाळेमध्ये गप्पा मारताना सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे गप्पा मारताना मास्क घालूनच गप्पा माराव्यात आणि वारंवार हात धुतले पाहिजे. सध्या तरी कोरोनावर कोणतेही औषध नसून या नियमांचे तंतोतंत पालन करणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.
शाळा प्रमुखांनीही शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची खरबदारी घेऊन वर्ग खोल्यांचे शौचालयाचे सॅनिटायझर करुन घ्यावे. विद्यार्थी आणि शिक्षक 100 टक्के मास्कचा वापर करतील याची जबाबदारी संबंधित शाळेची राहिल.  विद्यार्थी आजारी असल्यास त्यांनी शाळेत जावू नये आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी. पूर्णपणे बरे झाल्यानंतर शाळेत जावे. 9, 10, 11 व 12 मध्ये शिक्षक असणारे विद्यार्थी मास्कचा योग्य वापर, सुरक्षित अंतर ठेवून गप्पा व वारंवार हात धुतील असा विश्वासही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!