सातारा दि.26 (जि.मा.का): कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लग्न कार्यायासाठी एकदा तहसील कार्यालयातून परवानगी घेतल्यानंतर वाद्य वाजवणाऱ्या बॅन्ड पथक, बँन्जो पार्टी यांना वेगळी मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.
कोरोना संसर्गामुळे लग्न कार्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणे करणे बंधनकार असून या नियमानुसार लग्न कार्यास घातलेल्या मर्यादेतच नागरिक उपस्थित राहू शकतात. लग्न कार्यालयासाठी तहसील कार्यालयातून परवानगी घेतल्यानंतर वाद्य वाजविणाऱ्या बॅन्ड पथक, बँन्जो पार्टीसाठी वेगळ्या अशा कुठल्याही परवानगीची गरज नसल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.