तहसील कचेरी येथे केंद्र सरकारच्या विरोधात निवेदन देताना विविध संघटनांचे प्रतिनिधी (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती:
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणे व बदलाचा निषेध म्हणून बारामती एमआयडीसी मधील विविध कंपन्यांच्या वतीने आंदोलन करीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
कामगार विरोधी बदल व कायदे त्वरित रद्द करा,खाजगी तसेच कंत्राटी कामगार प्रथा त्वरित बंद करा, ,बँक,संरक्षण,आरोग्य,रेल्वे ,पेट्रोलियम, बांधकाम आदी क्षेत्रातील खाजकीकरणं बंद करा,घर,विडी कामगार रिक्षा वाले,पथारीवाले,अंग मेहनत आदी मजुरांना सुरक्षा योजना लागू करा,सर्व उद्योगात किमान वेतन 21000 हजार रुपये लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच लॉकडाऊन चा फायदा घेत कामगार विरोधी धोरणे करून
कामगारांची आर्थिक,सामाजिक व वेतन सुरक्षा धोक्यात आणली असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला आहे.
पेन्सील चौक येथे घोषणा दिल्यानंतर बारामती चे तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी ग्रीव्ह्ज कॉटन अँड अलाईड कंपनीज एम्प्लॉइज युनियन चे तानाजी खराडे,सचिन चौधर,अशोक इंगळे,हनुमंत गोलांडे,सुनील शेलार,पूना एम्प्लॉइज युनियन चे भाऊ ठोंबरे,मनोज सावंत,सचिन घाडगे,राहुल ठोंबरे,लिलाचंद्र ठोंबरे,संदेश भैय्या, भारतीय कामगार सेना चे भारत जाधव,पोपट घुले,सोमनाथ भोंग,श्रायबर डायनॅमिक्स डेअरीज एम्प्लॉइज चे नानासो केकान, रिना केकान,संदीप बनकर,सुरेश कुचेकर,अविनाश चांदगुडे,मनोज कारंडे,संजय गायकवाड,मन्सूर सय्यद, आय एस एम टी कामगार संघटना कल्याण कदम,गुरुदेव सरोदे, बाबासो आटोळे,संजय जांबले, सुहास शिंदे,संतोष साळवे,हेमंत सोनवणे,उमाजी भिलारे,गोपीचंद नवले,भारत फोर्ज कामगार संघटना (कॅम) निलेश भोईटे,राहुल बाबर,नंदकिशोर शिणगे, संतोष जाधव,आनंद भापकर,आय एम डी कामगार संघ वालचंद नगर नंदकुमार गोंडगे,प्रवीण बल्लाळ,पूना एम्प्लॉइज युनियन इंदापूर प्रमोद देशमुख,रमेश मदने,दिगंबर शिंदे,तुषार पवार,सुहास भोसले,जयकुमार साळुंके आदी कामगार प्रतिनिधी उपस्तीत होते या वेळी राष्ट्रवादी कामगार सेल चे प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे व इतर युनिट च्या प्रमुख यांनी मार्गदर्शन केले.
बारामती ,पणदरे,इंदापूर, एमआयडीसी, मधील कामगार व विविध संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.