दिलीपराव मुळीक
फलटण: फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी दिलीपराव मुळीक,नेतेपदी नवनाथ गावडे,तर सरचिटणीस पदी सतिश जाधव यांची निवड करण्यात आली.
नुकतीच फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाची बैठक फलटण येथील हॉटेल अशोका सभागृहात अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष सिध्देश्वर पुस्तके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सातारा जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीमध्ये फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
फलटण तालुका प्राथमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –
तालुकाध्यक्ष दिलीपराव मुळीक,नेतेपदी नवनाथ गावडे,सरचिटणीस सतिश जाधव,कार्याध्यक्ष हनुमंत चिंचकर,कोषाध्यक्ष सागर लोंढे,तालुका संपर्क प्रमुख सचिन यादव,कार्यालयीन चिटणीस अमित जाधव,प्रसिद्धी प्रमुख रमेश काशीद,विभागीय उपाध्यक्ष संजय भांडवलकर,भानुदास सोनवलकर,मधुकर शिंदे,किशोर चांदगुडे,विष्णू नाळे,तर सातारा जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख कुंडलीक जाधव,जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे,सचिन गुरव अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे सल्लागार रा. बा .लावंड (बापु),सातारा जिल्हा शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष मच्छीद्र मुळीक,जिल्हा शिक्षक संघाचे नेते सुरेशराव गायकवाड,शिक्षक बॅकेचे गट नेते मोहनराव निकम,सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण कमिटीचे तज्ञ सदस्य रुपेश जाधव,जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रविण घाडगे,शिक्षक बॅकेचे विद्यमान संचालक भगवान धायगुडे,
अनिल शिंदे,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र बोराटे,शिक्षक बॅकेचे विद्यमान संचालक अनिल शिंदे,मावळते तालुकाध्यक्ष लालासो भंडलकर,
माजी संचालक सिकंदर शेख,विक्रम दिवटे उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष लालासो भंडलकर यांनी प्रास्ताविक केले.संचालक अनिल शिंदे यांनी आभार मानले.राजेंद्र बोराटे व इम्तियाज तांबोळी यांनी सुत्रसंचालन केले.