फलटण प्रतिनिधी::–फरांदवाडी ता.फलटण येथील महाराष्ट्रात नावाजलेल्या कृषिक्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या चेअरमन पदी जेष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे यांची व्हा.चेअरमन पदी प्रमोद शिंदे तर सचिव पदी जगदीश बोराटे यांची निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या कंपनी सदस्यांच्या बैठकी मध्ये ही निवड करण्यात आली. गेली 5 वर्षे कंपनी कार्यरत असून महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला आहे शेती क्षेत्रात असलेल्या या कंपनीच्या माध्यमातून अनेक शासकीय योजना शेतकर्या पर्यंत पोहचविल्या आहेत धान्य ग्रेडिंग करणे,बी-बियाणे निर्मिती,गहू पिठाची विक्री, धान्य खरेदी व विक्री,कंपनीचे स्वतःचे सेंद्रिय खते औषधाचे दुकान सुरू असून फरांदवाडी गावा मध्ये सांस्कृतिक ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
येणाऱ्या काळात शेती विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट प्रकल्पात सहभाग घेऊन गावातील तरुणांना उद्योजक होण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे यावेळी चेअरमन सुभाष भांबुरे यांनी सांगितले
या निवडी बद्दल विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर ,कंपनीचे संस्थापक दत्तात्रय राऊत,माजी चेअरमन सौ अर्चना राऊत,राजेंद्र राऊत यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
या बैठकीत कंपनीच्या संचालक पदी मेघराज बोराटे,कपील राऊत,अश्विनी राऊत,सुजाता राऊत यांची नव्याने निवड करण्यात आली.यावेळी कंपनीचे व्यवस्थापक विजय राऊत,दिलीप दळवे,अरुण राऊत यांच्यासह कंपनीचे सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव जगदीश बोराटे यांनी केले तर शेवटी आभार संचालक कपील राऊत यांनी मानले.