मनोज तुपे यांनी सदर प्रमाणपत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या कडे सुपूर्द केले (छाया अनिल सावळेपाटील)
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशात कडक लॉक डाऊन मध्ये बारामती एमआयडीसी मधील रियल डेअरी ने देशातील सर्वच राज्यात ब्रिटानिया डेअरी ला अविरत सेवा व पुरवठा केल्याने ब्रिटाणीया ग्रुप ने रियल डेअरी चा सन्मान केला आहे.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र कडक लॉकडाऊन असताना रियल डेअरी ने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत रोज नवीन मास्क,सॅनिटायझर चा वापर,काम करताना सोशल डिस्टन्स वापर,वाहने रोज सॅनिटायझिंग करणे व हळदीचे दूध पिण्यास देणे आदी काळजी घेत वेळेवर व नियमित पणे एप्रिल पासून दरमहा 500 मेट्रिक टन स्वीट कंडेन्स मिल्क व 300 मेट्रिक टन मिल्क पावडर चा पुरवठा ब्रिटानिया डेअरी च्या आंध्रप्रदेश, आसाम,गुजरात,कर्नाटक,ओडिसा,
तामीळनाडू,तेलंगणा,उत्तरप्रदेश,
पश्चिम बंगाल आदी राज्यातील प्रकल्पावर मागणी नुसार वेळेवर केल्याने च ब्रिटानिया ग्राहकांना वेळेवर उत्पादन देऊ शकले मध्ये कोठेही खंड पडला नाही त्यामुळे ब्रिटानिया ने खास सन्मान पत्र पाठवून रियल डेअरी चा सन्मान केला आहे.
” रियल डेअरी भारतातील सर्वात मोठा स्वीट कंडेन्स मिल्क उत्पादन करणारा ग्रामीण भागातील पहिला प्रकल्प असून 58 मेट्रिक टन उत्पादन क्षमता असलेला प्रकल्प आहे , लॉक डाऊन मध्ये सुद्धा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुट्टी न घेता अविरत परिश्रम करत कोरोना पासून स्वतः ला व कुटूंबियाला कोरोना पासून बचाव करीत ब्रिटानिया डेअरी साठी अखंडित पुरवठा केल्याने हे यश मिळाले आहे” अशी माहिती रियल डेअरी चे चेअरमन मनोज तुपे व कार्यकारी संचालक अनिता तुपे यांनी सांगितले.
_______________________