फलटण : येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यु. कॉलेज (एस.एस.सी) जाधववाडी फलटण येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सन 2019/20 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी दिनांक 12 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे (एस.एस.सी) दोन विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीस ओम गणेश ढालपे याने 300 पैकी 226 गुण प्राप्त केले. तसेच वेदांत विनोद पाटील याने 300 पैकी 216 गुण प्राप्त करून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीस पात्र ठरले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असुन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व स्कूल किमटी चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रशासन अधिकारी मा.श्री.निकम सर, अधिक्षक मा.श्री.श्रीकात फडतरे सर, प्राचार्य सौ संध्या फाळके, परिवेक्षक एम.पी.निंबाळकर सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले