बारामती: कोव्हिड -19 च्या लॉकडाऊन मध्ये बारामती सायकल क्लब ने सामाजिक सुरक्षितता आणि बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस बांधवाना, जागापोहोच दोन्ही वेळचे जेवण पुरविल्याबद्दल आणि आजतागायतच्या बारामती सायकल क्लब तर्फे केल्या जनजागृती सायकल रॅली याबद्दल….”चांगुलपणाचे सन्मानार्थी शिलेदार” म्हणून बारामती सायकल क्लबला गुरुवार दि.१२/११/२०२० रोजी पुरस्कार, पत्रकार भवन येथे ,चांगुलपणाची चळवळ यांच्या वतीने श्री. अभिनव देशमुख (IPS) – पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यासह श्री. अनंत ताकवलेसाहेब (IPS – विभागीय पासपोर्ट अधिकारी ) आणि श्री. शेखर गायकवाड साहेब (IAS – आयुक्त साखर संकुल) यांच्यासह हस्ते पुरस्कार मिळाला…यावेळी मंचावर श्री. पराग मते, सौ. शुभांगी मुळे, लेखिका दीपा देशमुख, सौ. अश्विनी दरेकर, श्री. राज देशमुख उपस्थित होते*
सदर पुरस्कार बारामती सायकल क्लब च्या वतीने श्री. अविनाश भोसले, श्री. सचिन भंडारे, श्री. सागर जाधव, श्री. विक्रम तुपे आणि श्री. श्रीनिवास वायकर यांनी स्वीकारला…*
पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह ,शाल, बुके , आणि मेडल असे आहे..तर चांगुलपणाची चळवळ ची संकल्पना श्री. ज्ञानेश्वर मुळे (परराष्ट्र विभागाचे माजी सचिव) यांची असून यामध्ये भारत भरातून सदस्य किंवा संस्था सहभागी होत आहे या चळवळीत..
” कोरोना च्या पार्श्वभूमीवर केलेले कार्य म्हणजे माणुसकी होय त्याचा सन्मान म्हणजे माणुसकीचा सन्मान झाला ” अशी प्रतिक्रिया ऍड श्रीनिवास वाईकर यांनी या वेळी दिली.