फलटण दि. १० : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी मंगळवारी नुकसानग्रस्त भागाची व पिकांची बांधावर जऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. व त्यांना सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली .
संपूर्ण राज्यातील झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यामुळे शेतकऱ्याचे हाताशी आलेले पीक ही गेले.त्यामूळे शेतकऱ्यांच्या नशिबी पून्हा निसर्गापुढे हतबल होण्याशिवाय पर्याय उरला नाही पून्हा हातातील पिक गेल्यामूळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. सातारा जिल्ह्याला देखील या पावसाचा मोठा फटका बसला.
त्यामुळे फलटण पं. स . सभापती श्रीमंत शिवरूपराजे यानी शेतकऱ्यांच्या बांधावर . जाऊन या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या व अकी अडचणी जाणून घेतल्या यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या. यावेळी श्रीमंत शिवरपराजे यांनी शेतकर्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देऊ असे सांगितले .
या दौऱ्यादरम्यान सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या समवेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग देखील उपस्थित होता. यावेळी शेतकऱ्याबरोबर शेतीतील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडी अडचणी जाणून घेवून त्या सोडविण्यासंदर्भात आश्वासन दिले व वरिष्ठस्तरावर आपण स्वतः याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यामूळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.