बारामती फलटण टुडे वृत्तसेवा :
बारामती एमआयडीसी मधील रियल डेअरी प्रा ली कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून कंपनी मधील पदानुसार प्रत्येकी 10 ते 25 हजार रुपये चे वाटप करण्यात आले आहे.
कोरोना चे महा संकट मध्ये कंपनीस कोट्यवधींचा तोटा झाला होता व दुध दरा मध्ये चढ उतार असताना सुद्धा कंपनी साठी कर्मचाऱ्यांनी दिलेली खंबीर साथ याची जाणीव ठेवून या वर्षी कंपनी प्रशासन ने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणे साठी कर्मचाऱ्यांना बोनस दिला आहे अशी माहिती रियल डेअरी चे चेअरमन मनोज तुपे व व्यवस्थापकीय संचालिका अनिता तुपे यांनी माहिती दिली.
कंपनी प्रशासन दिवाळी निमित्त बोनस दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.