गोखळी (प्रतिनिधी ) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी वृक्षमिञ श्री.अजितसिंह गावडे-पाटील यांचा वाढदिवस वृक्षरोपन करुन साजरा करण्यात आला यावेळी अजयसिंग गावडे यांनी गोखळी आणि परिसरात सुमारे एक वृक्ष लागवडीचा संकल्प केला .आजपर्यंत गावातील ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वृक्ष भेट देऊन त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येत आहे असे दोनशे वृक्ष लागवड केली आहे. एक हजार वृक्ष लागवड स्वतः करण्याचा संकल्प यावेळेस गावडे यांनी केला.या प्रसंगी मनोहर तुकाराम गावडे,रमेश शुक्राचार्य गावडे,महेश जगताप,पिंटू जगताप,राजेंद्र सोपान गावडे, राजेंद्र रक्माजी गावडे,श्रीकांत गावडे व बंटी गावडे उपस्थित होते.या शुभदिनी पूर्वीची २०० झाडे सोडून पुढील काळात सुमारे ११०० वृक्षलागवडीचा संकल्प श्री.अजितसिंह पाटील यांच्याकडून करण्यात आला.