फलटण :
धुमाळवाडी ता.फलटण
येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्व्हेक्षण,सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत डाळिंब या फळपिकाची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री.भास्कर कोळेकर उपस्थीतांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,फलटण तालुक्यामध्ये फळपिकांखालील क्षेत्र वाढत असून फलोत्पादनामध्ये गिरवी,धुमाळवाडी,निरगुडी येथील शेतकरी आघाडीवर आहेत.शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी गटांची स्थापना करून डाळिंब,सिताफळ आणि अंजीर यावर प्रक्रिया उद्योग सुरु केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीस चालना मिळून शेतकर्यांच्या हाती अधिकचा पैसा खेळेल यासाठी कृषि विभागाच्या स्मार्ट प्रोजेक्ट व इतर योजनांमधून अर्थसहाय्य देता येऊ शकते. तसेच विकेल ते पिकेल या शासनाच्या महत्वकांक्षी धोरणानुसार उत्पादक कंपन्या व गटांना सहभागी करुन घेता येईल.
डाळिंब पिकावरील मर रोग व तेलकट डाग रोग व्यवस्थापन बाबत सविस्तर माहिती डाळिंब विशेषज्ञ श्री.योगेश भोंगळे यांनी दिली.
तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड करणेबाबत उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले.
मंडळ कृषी अधिकारी अमोल सपकाळ यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमानंतर डाळिंब फळबागेच्या मर रोगग्रस्त झाडांना प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेट दिली व उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी फलटण श्री. सुहास रणसिंग, मंडळ कृषि अधिकारी विडणी श्री. अमोल सपकाळ, कृषी पर्यवेक्षक श्री. अंकुश इंगळे, कृषी सहायक श्री.अजय एकळ व श्री.चंद्रकांत मंडलिक, धुमाळवाडी गावचे सरपंच श्री. समीर पवार, पोलीस पाटील श्री. शरद पवार, बबनराव हुंबे, कृषि मित्र संजय धुमाळ,सचिन पवार,सतिश सुर्यवंशी, संतोष धुमाळ, सुनिल हुंबे,विकास हुंबे, रामदास शिरतोडे व परिसरातील शेतकरी उपस्थीत होते, यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री. अंकुश इंगळे यांनी प्रास्ताविक केले. कृषी सहायक श्री.अजय एकळ यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन श्री. राजाराम धुमाळ सर यांनी केले..