बारामती : फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती एमआयडीसी येथील श्रायबर डायनामिक्स डेअरीज एम्प्लॉईज युनियन च्या वतीने दिवाळी निमित्त बोनस बरोबर सर्व सभासदांना प्रत्येकी पाच लिटर सूर्यफूल तेल व कंत्राटी कामगारांना प्रत्येकी दोन लिटर सूर्यफूल तेलाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे शुभारंभ कंपनीचे रिजनल मॅनेजर जितेंद्र जाधव युनियनचे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बिझनेस सपोर्ट मॅनेजर मंजुश्री चव्हाण,युनियनच्या उपाध्यक्षा सौ. रीना केकाण, सरचिटणीस संदीप बनकर, कार्याध्यक्ष सुरेश कुचेकर, खजिनदार अविनाश चांदगुडे , मनोज कारंडे, मन्सूर सय्यद, व संजय गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघटना कटिबद्ध असल्याने संघटनेचे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जितेंद्र जाधव यांनी सांगितले. कर्मचारी व त्यांचे कुटूंब आर्थिक सुखी राहावे या साठी संघटना नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांनी सांगितले.दिवाळी साजरी करताना कोरोना व फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आव्हान सौ. मंजुश्री चव्हाण यांनी सांगितले.
संघटना सरचिटणीस संदीप बनकर यांनी सुत्रसंचालन केले .