श्रीमंत संजीवराजे यांना विधान परिषदेवर बिनविरोध पाठवा

   फलटण : श्रीमंत संजीवराजे यांनी राजकारण व समाजकारणात सक्रिय झाल्यापासून गेली २५/३० वर्षे फलटण तालुक्यातील सर्वसामान्यांच्या सतत संपर्कात राहुन त्यांच्या प्रश्नांची मांडणी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या माध्यमातून शासन/ प्रशासनासमोर करताना त्याची सोडवणूक करण्याला प्राधान्य दिले, त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष म्हणून या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोगही सतत लोकांच्या हितासाठी केलेल्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पुणे पदवीधर मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देवून महाराष्ट्र विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी फलटण करांमधून झाली आहे.

*फलटण एज्युकेशन सोसायटी, मालोजीराजे बँक, फलटण तालुका सहकारी दूध संघ, गोविंदचे माध्यम : सेवेचे माध्यम*
     संस्थान काळापासून शहर व तालुक्यातील प्रत्येक मुलगा/मुलगी शिकली पाहिजे ही भूमिका घेऊन राजघराण्याने शिक्षण क्षेत्र विकसीत केले. शताब्दी पूर्ण केलेले मुधोजी हायस्कुल, ३० वर्षाहुन अधिक काळ पदवीचे शिक्षण देणारे मुधोजी महाविद्यालय किंवा शेती शिक्षणाला प्राधान्य देऊन सुरु असलेले मालोजीराजे शेती विद्यालय, त्यानंतर सुरु झालेली कृषी व फलोद्यान महाविद्यालये, अभियांत्रिकी व नर्सिंग महाविद्यालये किंवा या सर्व ठिकाणी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा विद्यार्थी घडविण्याला प्राधान्य देत श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व श्रीमंत शिवाजीराजे यांच्या नंतर श्रीमंत संजीवराजे यांनी घेतलेली मेहनत निश्चित प्रेरणादायी आहे.
        शेतीला जोड धंदा म्हणून राज्यभर दूग्ध व्यवसाय स्वीकारण्यात आल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा नेमका अर्थ समजावून देत शेतीचे अर्थशास्त्र बदलणारे प्रयोग करुन जनावरे वाढवून दुधाचे उत्पादन न वाढविता उत्पादन खर्च कमी करुन प्रति जनावर दूध उत्पन्न कसे वाढेल यांचे तंत्रज्ञान दूध उत्पादक शेतकरी कुटुंबाला समजावून देत गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय विकसीत करुन अनेक पदवीधर तरुणांना शेतीबरोबर हा नवा पूरक व्यवसाय विकसीत करण्याची संधी दिली, त्याला तालुका सहकारी दूध संघाची साथ देऊन तालुक्यात खऱ्या अर्थाने धवल क्रांती घडविणारे नेतृत्व म्हणून आज केवळ सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील दुग्ध व्यवसाय श्रीमंत संजीवराजे यांचा सल्ला, मार्गदर्शन घेण्यासाठी उत्सुक असल्याचे अनेक प्रसंगात दिसून आले आहे.
     कृषी किंवा दुग्ध व्यवसायाला असलेली आर्थिक मदतीची गरज भागविण्यासाठी माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे यांच्या प्रयत्नाने उभी राहिलेली मालोजीराजे सहकारी बँक या क्षेत्रातील गरजूंना मोठा आर्थिक आधार देणारी संस्था म्हणून अनंत अडचणी आल्यातरी त्याची पर्वा न करता कार्यान्वित ठेवण्यात श्रीमंत संजीवराजे यांनी केलेले प्रयत्न, घेतलेली मेहनत सर्वश्रुत आहे.

*प्रचंड लोकप्रियता लाभलेले बहुआयमी नेतृत्व*             

         फलटण पंचायत समिती सभापती, सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून किंवा सलग २५ वर्षे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत तालुक्यातील प्रत्येकवेळी वेगळ्या मतदार संघातून मोठया मताधिक्याने विजयी झालेल्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधानसभा किंवा लोकसभेवर मतदारांनी निश्चित मोठया मताधिक्याने निवडून दिले असते, मात्र इतकी लोकप्रियता लाभलेल्या श्रीमंत संजीवराजे यांनी ती संधी पक्षाकडे कधी मागितली नाही, अन्यथा माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या हातून गेला नसता अशी भावना लोकांमधून व्यक्त होत आहे.

*पक्ष व नेतृत्व सोपवेल ती जबाबदारी बिनचूक पार पाडणे यालाच प्राधान्य*
   
         श्रीमंत संजीवराजे स्वतः कोणत्याही सत्तेच्या मागणीसाठी उत्सुक नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदराव पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार काम करणे, ते सोपवतील ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हीच त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट करीत आम्हा कार्यकर्त्याना श्रीमंत संजीवराजे तथा बाबा सतेच्या पदावर असावेत, त्यामाध्यमातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक अधिक गतीने व्हावी अशी अपेक्षा असल्याने आपण, ही मागणी करीत असल्याचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

*ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत एकहाती सतेचे शिल्पकार*
   
         राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यापासून फलटण तालुक्यामध्ये  ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत किंबहुना लोकसभेपर्यंत एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे ठेवण्याचे काम महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, महाराष्ट्र  विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष ना.जयंत पाटील, बारामती लोकसभा मतदार संघाच्या खा.सुप्रियाताई सुळे, आ.दिपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्या मार्गदर्शन व साथीने केले असल्याचे या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.

*दिवसभर लोकांसाठी कार्यरत राहणारे कर्तृत्ववान नेतृत्व*

         गेली सलग २५/३० वर्षे सकाळी ८ वाजता आपल्या लक्ष्मीनगर येथील सरोज व्हिला या निवासस्थानी तालुक्यातून येणाऱ्या विविध समाज घटकातील लोकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सकाळी १२ वाजेपर्यंत सुरु असते, दररोज शेकडो लोक यावेळेत त्यांना भेटून आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडत असतात मात्र तेथून कधीही कोणीही नाराज होऊन गेल्याचे ऐकिवात नाही, त्यानंतर विविध संस्थांच्या बैठका, तेथील कामकाजात भाग घेणे, त्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखाना, पंचायत समिती, नगर परिषद, फलटण एज्युकेशन सोसायटी, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, गोविंद मिल्क, दूध संघ, ग्रामीण भागातील अन्य सहकारी संस्था, ग्रामपंचायती, विकास सोसायट्या वगैरेंचा समावेश असतो, त्यानंतर स्वतःचे खाजगी उद्योग व्यवसाय याची पाहणी नंतर ग्रामीण भागातील कार्यक्रम, कोणाच्या लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमास, एखाद्याच्या कुटुंबातील दुःखद प्रसंगात त्यांची भेट घेणे वगैरे सकाळी ८ ते रात्री उशीरापर्यंत सतत लोकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या या नेत्याला पुणे पदवीधर मतदार संघाच्या माध्यमातून विधान परिषदेवर कामाची संधी दिली गेल्यास त्याचे ते निश्चित सोने करतील, सर्व सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे एक प्रभावी शस्त्र त्यांच्या हाती लागल्यावरच त्यांच्या कामाची राज्यस्तरावर नोंद होईल, यासाठी त्यांना संधी मिळावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

*त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी*
          
         फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने श्रीमंत संजीवराजे यांना विधानसभा मतदार संघामधून निवडून जाता आले नाही, वास्तविक पाहता फलटण तालुक्यासह जिल्ह्यामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला असून त्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुप्रीमो  खा.शरद पवार यांनी घेऊन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पुणे पदवीधर मतदार संघाच्या माध्यमातून विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी फलटण तालुक्यातून जोर धरु लागली आहे.

*श्रीमंत संजीवराजे यांना संधी देऊन २५/३० वर्षाच्या कामाचा गौरव व्हावा*
       
         सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून हा बालेकिल्ला उभारण्यात फलटणकरांनी जिल्हावासीयांच्या सहकार्याने पक्षश्रेष्ठीच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावली आहे. विधान परिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणारे सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्टींनी पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर पाठवून त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी अपेक्षा फलटणकरांमधून व्यक्त होत आहे.

*पक्ष अधिक बळकटीसाठी प्रयत्नशील नेतृत्व*
      
         श्रीमंत संजीवराजे यांचे कर्तृत्व व नेतृत्व सर्व जिल्ह्याला माहित असून अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाला विधान परिषदेवर कामाची संधी दिली तर सातारा जिल्ह्यात पक्षाची अजून चांगली बांधणी होईल. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये विविध घटकांशी अतिशय चांगले संबंध असून या संबंधांचा फायदा सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होईल यात कसलीही शंका नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुप्रिमो खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी श्रीमंत संजीवराजे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर कामाची संधी द्यावी अशी मागणी फलटण सह जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातूनही होत आहे.
Share a post

0 thoughts on “श्रीमंत संजीवराजे यांना विधान परिषदेवर बिनविरोध पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!