पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश जारी*

                सातारा दि. 5 (जिमाका): पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून सातारा जिल्ह्यात सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जारी केले आहेत.

                या आदेशानुसार . निवडणूकीचे कालावधीमध्ये सातारा जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तहसिल कार्यालये आणि सर्व शासकीय कार्यालय व विश्रामगृह या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणुका, मोर्चा काढणेस प्रतिबंध करणेत येत आहे. सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेणेस मनाई करणेत येत आहे. कोणत्याही व्यक्ती, संस्था पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा, लाऊडस्पीकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही.  फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना त्यावरील ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.  निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी 06.00 वाजे पुर्वी व रात्री 10.00 वाजेनंतर करता येणार  नाही. भारत निवडणूक आयोग यांचे आदेश क्र.437/6/96(पीएलएन-तीन)/2411, दि. 15 जानेवारी 1966 अन्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असेलेल्या शासकीय मोटारगाडया/वाहने यांच्या ताफ्यामध्ये पाच पेक्षा जास्त मोटारगाडया, वाहने वापरणेस निर्बंध राहील.. सार्वजनिक ठिकाणी संबंधीत पक्षांचे चित्रे, चिन्हांचे कापडी फलके, तसेच पुर्व परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे यावर निर्बंध राहील. शासकीय / निमशासकीय/सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपता करण्यास निर्बंध घालणेत येत आहे.  कोविड 19 चे अनुषंगाने शासनाने, इकडील तसेच याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या आदेशाचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!