महाबळेश्वर सायकल रॅलीत सहभागी झालेले सायकल पटू (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
सळसळता उत्साह, काहीतरी नवीन करूनदाखविण्याची जिद्द, आम्हीही हे करू शकतो, या विश्वासानेबारामतीतील दहा महिलांसह ६५ हौशी सायकलपटूंनी रविवारी बारामती-महाबळेश्वर-बारामती अशी २५० किलोमीटर सायकल रॅली पूर्ण केली.
बारामतीत सायकल चळवळीला प्रोत्साहन मिळावे,
व्यायामाची आवड समाजात वाढीस लागावी ,युवक व
महिलांमध्ये सायकल चालविण्याची सवय होणे साठी बारामती स्पोर्ट्स फौंडेशन च्या वतीने या सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश ननवरे यांनी दिली.रविवारी पहाटे चार वाजता उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे नगरपालिका चे गटनेते सचिन सातव , भाजपचे नेते प्रशांत नाना सातव यांनी ध्वज दाखवून रॅलीला निरोप दिला. संध्याकाळी सायकल स्वरांचे कौतुक सोहळा साठी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,उद्योजक आर एन शिंदे ,ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,डॉ अजिनाथ खरात,डॉ हेमंत नगर,प्रशांत सातव आदी उपस्तीत होते.बारामती फलटण आदक्री, वाई,पाचगणी मार्गे महाबळेश्वर 250 किलोमीटर अंतर पार करत ही मोहीम फत्ते केली.रॅली मध्ये सोळा वर्षाच्या युवका पासून ते ललित पटेलव गीता पटेल या ज्येष्ठ दाम्पत्याने सुद्धा सहभाग नोंदवला.
चौकट
बारामती करा साठी नेहमीच मार्गदर्शन करणार
बारामती मधील खेळाडूने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवावे म्हणून नेहमीच माझ्या क्षेत्रातील खेळाडूना मोफत सहकार्य व मार्गदर्शन करत राहू ग्रामीण भागातील खेळाडूंनी न्यूडगुंड बाळगू नये असाही सल्ला सतीश ननवरे यांनी दिला.