बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती रुई येथील त्रिवेणी लाकडी घाणा ऑइल अँड फूड प्रॉडक्ट च्या संस्थापक संचालिका शुभांगी चौधर यांना गौरव आधुनिक दुर्गांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रबोधन फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने समाजातील शिक्षण आरोग्य प्रशासन समाजकारण आदी परिघात कार्यरत तसेच कोरोना काळातही भरीव काम केलेल्या महिलांच्या ‘गौरव आधुनिक दुर्गांचा ‘ गौरव सोहळ्यात किमान वेतन सल्लागार मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व शिवसेना उपनेते रघुनाथ कुचीक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मेधा ताडपत्रीकर , ज्योती पांडे सुनीता नाशिककर ,मनीषा जाधवर – दराडे ,सुरेखा भालेराव ,वैजयंती मगर ,निता थोरवे, मानसी सावंत ९ महिलांचा सन्मानपत्र , मानाची पैठणी भेट देउन गौरव करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या अनिता दीक्षित होत्या तर प्रमुख पाहुने म्हणून डॉ गीतांजली घोलप ,प्रा प्रज्ञा कुलकर्णी , जिल्हा कृषी अधिकारी संतोष दराडे , डॉ रितुपर्ण शिंदे , अतुल दीक्षित ,शिरीष फडतरे इ मान्यवर उपस्थित होते.
कष्टकरी श्रमीक वंचीत व शेतकरी कुटूंबातील महिला या प्रसंगी पोटाला चिमटा काढून आपली पुढील पिढी घडविन्यासाठी झटत आहेत. त्यांच्यात मला दुर्गचे दर्शन घडते म्हणून तुमच्या दोन पाउले मागे असलेल्या या गरीब अन वंचित भगिनीच्या उत्कर्षकरीता सहयोगाची भूमिका घ्यावी , प्रबोधन फाउंडेशन तुमच्या सोबत आहे . तसेच महिलांच्या वरील वाढते हल्ले चिंताजनक असुन यासाठी घराघरातून सुयोग्य संस्कार अन मानवीय प्रबोधनाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ रघुनाथ कुचिक सांगितले.
शुभांगी चौधर या आजार पणा मुळे लाकडी घाणा ऑइल क्षेत्रात आल्या व व्यवसाय सुरू करून अनेक महिलांना रोजगार प्राप्त करून देत त्रिवेणी कट्टा,महिला मार्गदर्शन,पोलीस मित्र संघटना,महिलांना स्वयंरोजगार आदी क्षेत्रात सहकार्य करत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत सदर पुरस्कार देत असल्याचे गायत्री भागवत यांनी सांगितले तर प्रा देविदास बिनवडे यांनी सूत्रसंचालन केले