घाडगे वस्ती येथील ऊसाच्या शेतात वन्य प्राण्यांच्या ठस्याची पाहणी करताना वन विभाग चे कर्मचारी (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
रुई परिसरातील घाडगेवस्ती येथे (रविवार 1 नोव्हेंबर) सकाळी सात च्या सुमारास बिबट्या सारखा प्राणी दिसला असल्याची चर्चा नागरिकां मध्ये असून तो बिबट्या आहे का अन्य कोणता वन्य प्राणी आहे या बाबत तपास चालू असल्या चे वन विभाग यांच्या कडून सांगण्यात येत आहे .
घाडगे वस्ती परिसर मध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती व पलीकडील बाजूस नागरिकांची वसाहत आहे त्यामुळे त्या ठिकाणी नेहमी वर्दळ असते सकाळी बिबट्या दिसल्याने काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.वन विभाग चे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येक्ष घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली असता सदर पायाचे ठसे हे बिबट्या ,तरस किंवा अन्य प्राण्यांचे आहेत का हे पाहणे साठी प्रयोगशाळा कडे पाठवले आहेत.अहवाल आल्यावर जर बिबट्या असेल ते पिंजरा लावून पकडण्या साठी प्रत्यन करू अशी माहिती वनाधिकारी राहुल काळे यांनी दिली.
बिबट्या घाडगे वस्ती मध्ये आला या अफवेने रुई परिसरात नागरिकां मध्ये घबराट निर्माण झाली आहे.