फलटण (फलटण टुडे वृत्तसेवा ) :फडतरवाडी गावातील गरजू लोक व आशा सेविका यांच्यासाठी 100 स्टिम वेपोरायझर मशीनचे वितरण के.बी एक्सपोर्ट कंपनीच्या वतीने करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपण्याची कंपनीची परंपरा जपत फडतरवाडी गावच्या कोरोणा विरुद्धच्या लढ्यांमध्ये सहभागी होत कंपनीकडून या मशीनचे वितरण करण्यात आले. यापूर्वीही कंपनीच्या माध्यमातून लॉकडाउनच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले होते अशी माहिती फडतरवाडी गावचे पोलीस पाटील शांताराम काळेल पाटील यांनी दिली.
फडतरवाडी ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी बहुमूल्य अशी मदत केल्याबद्दल के. बी. एक्सपोर्ट कंपनीचे डायरेक्टर श्री. सचिन यादव साहेब व कंपनीचे जनसंपर्क अधिकारी श्री. संदीप शिंदे यांचे आभार फडतरवाडी गावातील ग्रामस्थ धनंजय भोसले, मंगेश नाळे, योगेश फडतरे,विजय फडतरे यांनी मानले.