फलटण : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक जवळ आलेली आहे. विद्यान संचालक मंडळाची मुदत जूनध्येच संपलेली आहे. परंतु कोरोना संकटामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. आता निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर विद्यमान सत्ताधारी (पुस्तके गट) व विरोधी (शिक्षक समिती) यांच्याध्ये सभासदांची काळजी आम्हालाच जास्त आहे हे दाखविण्याची चढाओढ सुरू झालेली आहे. दि . 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या बँकेच्या मासिक सभेत विद्यमान चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी कर्जाचे व्यवहार कमी करण्याचा ठराव मांडला व त्याला पुस्तके गटाच्या 10 संचालकांनी व शिक्षक समितीच्या 4 संचालकांनी हातात हात घालून विरोध केला. विद्यमान चेअरमन यांचेकडे फक्त 7 संचालक उरल्याने बहुमताअभावी व्याजदराचा निर्णय होऊ शकला नाही. खरतर शिक्षक समिती विरोधी बाकावर असतानाही त्यांनी पुस्तके गुरूजींचा आदेश कसा काय पाळला याचे कोडे जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांना पडले आहे.
मागील चेअरमन बलवंत पाटील यांच्याही चांगल्या धोरणांना पुस्तके गट कायम विरोध करीत होता. त्यावेळीही समितीचे संचालक पुस्तके गटाबरोबरच राहिल्याचे सभासद सांगतात. गेल्यावर्षी बँकेत फार मोठी नोकरभरती झाली. या नोकर भरतीत पुस्तके गट व समिती एकत्रच होती. आता व्याजदराला विरोध करणारे समितीच्या संचालकांनी नोकर भरतीला पाठिंबा दिला होता. या नोकरभरतीत पुस्तके गट व समिती मधील अनेक मोठया नेत्यांची मुले, सूना, मुली, नातेवाईक यांचीच भरती झालेली आहे. संगणकाच्या युगात एवढी मोठी नोकरभरती करून बँकेवर फार मोठा आर्थिक बोजा म्हणजे जवळ जवळ वर्षाला 1 कोटी सत्ताधारी व विरोधकांनी संगनमत टाकला आहे. बँकेचे चेअरमन व पुस्तके यांनी बँकेचे नियम पायदळी तुडवून स्वतःसाठी मोठया प्राणात कर्ज घेऊन कर्जर्यादेचे उल्लंघन केलेले आहे.
आता झालेल्या बैठकीत बँकची आर्थिक स्थिती चांगली नाही म्हणून व्याजदराला विरोध करणारे संचालक एक वर्षापूर्वी झालेल्या नोकरभरतीवेळी मूग गिळून गप्प होते. समितीचे एक स्वयंघोषित संचालकांचे नेते सोशल मिडियातून समितीने व्याजदर कमी करावा अशी मागणी केल्याचे नाटक करून अशा खोट्या पोस्ट टाकून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांनी िटिंगध्ये व्याजदराला विरोध करताना केलेले आकडतांडव सर्वांनी पाहिले आहे. खरेतर पुस्तके गट व समितीचे संचालक, नोकर भरतीमधील र्कचारी कायम करा या मागणीसाठी सभागृहामध्ये गोंधळ घालत होते. त्यावेळी त्यांना ज्या सभासदांनी आपल्याला निवडून दिले त्याचा विसर पडला होता. व्याजदर कमी झाल्यास जिल्ह्यातील सर्व सभासदांना फायदा होणार होता तरीही अशा चांगल्या निर्णयास पाठिंबा देण्याची ानसिकता पुस्तके गट व समिती गटाध्येही नाही. बँकेच्या मिटिंगची बातमी वर्तमानपत्रात आल्यापासून समितीचे नेते व संचालकांचे स्वयंघोषित नेते जिल्हाभर फिरून सोशल मिडियातून व्याजदर कमी झाला पाहिजे असे सांगत फिरत आहेत. पण त्यांच्या या भूलथापांना बँकेचे सर्वसामान्य सभासदर आता बळी पडणार नाहीत.
मागील चेअरमन बलवंत पाटील यांनी विठ्ठल माने यांनी केलेल्या अनावश्यक नोकर भरतीमधील कर्मचारी कमी केले. पण नंतर बलवंत पाटील यांनी चेअरमनकीचा राजीनामा दिला व विद्यमान चेअरमन घोरपडे पदावर आले. त्यानंतर थोडयाच दिवसात बलवंत पाटील यांनी कमी केलेले र्कचारी बँकेध्ये कामावर परत रूजू झाले. त्यावेळी फारमोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा सभासदांध्ये आहे. याध्ये समितीचे नेते व सिध्देश्वर पुस्तके यांच्यात अनेकवेळा गोपनिय बैठका पार पडल्या होत्या. नंतर बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी नोकर भरती झाली त्यावेळी शिक्षक सतिी पुस्तके गुरूजींबरोबरच होती. या भरतीध्ये पुस्तकेंच्या सुनबाईंची व संचालकांच्या नातेवाईकांची निवड झालेली आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे. या भरतीमध्ये कितीजण परिक्षेत पास झाले, कितीजण ुलाखतीला उपस्थित राहिले व किती र्कचार्यांची निवड झाली व किती कर्मचार्यांना कामावर रूजू केले हे अजूनही जाहिर केलेले नाही. यामागचे गोडबंगाल गुपीत आहे. गेल्या 4 महिन्यांपासून विद्यमान चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी पुस्तके गुरूजींच्या चुकीच्या कामाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. सभासदांना दिलासा देण्यासाठी व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता पण एनवेळी समितीने पुस्तके गटाला पाठिंबा दिल्याने व्याजदर की होऊ शकले नाही. समितीच्या संचालकांचे नेते सभागृहाध्ये एक व बाहेर दुसरेच सांगत सुटले आहेत. अशा प्रकारे बँकेत पुस्तके गट व समिती यांची अभ्रद युती झालेली आहे. आगामी बँक निवडणूकीतही हे दोन्ही गट एकत्र येण्याची कुजबूज सभासदांमध्ये आहे. अशाप्रकारे गलिच्छ राजकरण करून सभासदांना वार्यावर सोडणार्या पुस्तके गट व समिती यांना धडा शिकविण्यासाठी सर्व संघटनेचे सुज्ञ सभासद एकत्र येऊ लागले आहेत. त्यामुळे होऊ घातलेली शिक्षक बँकेची निवडणूक ऐतिहासिक होणार आहे यात मात्र शंका नाही.