फलटण, दि.30 : जिल्हा परिषद शाळा कचरेवाडा (ता.फलटण) येथील शिक्षक, गोखळी गावचे सुपुत्र तथा महादेवमाळ (फलटण) येथील रहिवासी राजेंद्र भिकोबा धुमाळ (वय 46 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
राजेंद्र धुमाळ हे अत्यंत मनमिळावू, सामाजिक उपक्रमात पदरमोड करुन सढळ हाताने मदत करणारे होते. त्यांच्या निधनाने गोखळी ग्रामस्थांसह, महाराष्ट्र राज्य आयडियल बहुजन टिचर्स असोसिएशन , सातारा जिल्हा आयडियल टिचर्स असोशिएशन, फलटण तालुका बहुजन टिचर्स असोशिएशन (इब्टा परिवार ) त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच त्यांच्या अचानक जाण्याने सहकारी शिक्षक, मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज (दि.30 रोजी) पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.