केंद्रा च्या कामगार विरोधी बदलावर राष्ट्रवादी कामगार सेलचा अक्षेप बारामती मधील कामगार आवाज उठवणार

बैठक मध्ये मार्गदर्शन करताना नानासो थोरात व  उपस्तीत कामगार नेते व अधिकारी वर्ग
बारामती: (फलटण टुडे वृत्तसेवा )
 केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदा बनविला असून त्यास प्रखर विरोध करण्याचे राष्ट्रवादी कामगार सेल च्या बैठकीत ठराव संमत करण्यात आला.
मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये  येथे गुरुवार 29 ऑक्टोम्बर रोजी झालेल्या   बैठक मध्ये  कामगार कपातीसाठी 100 पेक्षा जास्त कामगार ज्या कंपनीत आहेत त्या ठिकाणी कामगार कपातीसाठी शासनाची परवानगी घ्यावी लागत होती ती मर्यादा आत्ता 300 कामगार पेक्षा जास्त कामगार ज्या कंपनीमध्ये आहेत त्यांच्यासाठी केलेली आहे यामध्ये 70 टक्के कारखान्यांमध्ये कामगार यांच्या नोकरी असुरक्षित झाल्या आहेत फिक्स कामगार हे फिक्स टर्म कॉन्ट्रॅकवर कामगारांना घेतले जाणार व कायम स्वरूपी कामगारांना नोकऱ्या मिळणार नाहीत कारण 50 पेक्षा जास्त कामगार काम करतात त्या ठिकाणी स्टॅंडिंग ऑर्डर लागू होत्या ती मर्यादा ह्या केंद्र सरकारने आता 300 कामगारावर नेलेली आहे त्यामुळे 70 टक्के कामगार याच कायद्यातून बाहेर गेलेले आहेत आणि कंत्राटी कामगारांची पगार व इतर देणे दिली नाही तर मूळ मालकास जबाबदार धरले जात होते आता नवीन कायद्यामुळे मालकास या जबाबदारीतून वगळले आहे व संघटनेला मान्यता देण्याचा अधिकार या कायद्यामुळे मालकास देण्यात आला आहे आणि जर कामगारांना एखादी कंपनी नफा असून सुद्धा चांगली पगार वाढ देत नसेल तर कामगारांना संपावर जाण्यासाठी 14 दिवसाच्या ऐवजी या केंद्र सरकारने 60 दिवसाची मर्यादा केली आहे यासारखे असंख्य बदल कामगार विरोधी आहेत त्यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल च्या वतीने या बैठकीमध्ये या कामगार कायद्याचा निषेध नोंदविण्यात आला .या प्रसंगी 
 कामगार सचिव श्रीमती वनिता वैद्य-सिंगल, कामगार आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर, सह कामगार आयुक्त श्री रविराज इळवे , अप्पर कामगार आयुक्त  काकतकर, उप कामगार आयुक्त  विश्राम देशपांडे , सहसचिव  महेश  साठे, डॉ पुलकुंडवार 
राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने अध्यक्ष  शिवाजीराव (भाऊ) खटकाळे, 
सेक्रेटरी  सोमनाथ शिंदे  ,
संघटक श्री नानासो थोरात
श्री शरद जावळे श्री. राजेंद्र कोंडे                    
श्री उमेश शिंदे श्री बाळू झरे 
अँड श्री दिलीप चव्हाण
आणि एच एम एस युनियनचे  संजय वढावकर महेश  राव आदी मान्यवर उपस्तीत होते.
राज्य मध्ये कामगार विरोधी कायद्या च्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असून बारामती एमआयडीसी मधून त्याची जोरदार सुरवात करण्यात येणार असल्याचे श्रायबर डायनामिक्स डेअरी युनियन चे अध्यक्ष नानासो थोरात यांनी सांगितले.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!