बारामती: (फलटण टुडे वृत्तसेवा )
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे ते सध्या मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांची लवकरात लवकर प्रकृती सुधारावी यासाठी शहरातील जळोची येथील महाकाळेश्वर मंदिर मध्ये शुक्रवार दि 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत महादेव च्या पिंडीवर दूध अभिषेक घालून दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली या वेळी जळोची चे माजी सरपंच दत्तात्रय माने दूध संचाचे माजी उपाध्यक्ष प्रताप (आबा)पागळे, सावता गोरे, मच्छिंद्र शेंडगे, दिलीप जमदाडे, सागर शिंदे अभिमन्यू ढाळे उपस्तीत होते जळोची मधील सदर म्हाकालेशवर मंदिर जीर्णोद्धार साठी अजित दादाचे योगदान आहे व जळोची च्या विकासासाठी अजित दादा नेहमी प्रत्यन शील असतात त्यामुळे जळोची च्या मंदिरात अभिषेक करण्यात आल्याचे प्रताप पागळे यांनी सांगितले.