सातारा (फलटण टुडे ) दि.28 (जिमाका): कोरोना संसर्ग कमी झाला आहे, याचा अर्थ तॊ संपला आहे असा नाही. लोकांनी मार्केट, वाहतूक खुली झाली म्हणून कोरोना काळाचे नियम मोडून वागणूक केली तर पुन्हा तेच दिवस येतील म्हणून सातारा जिल्ह्यातील जनतेनी पूर्वी जी काळजी घेतली तिच काळजी दिवाळीच्या निमित्त बाहेर पडताना घ्यावी असे नम्र आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
युरोप देशांमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. सध्या युरोप देशांमध्ये रोज दिड ते दोन लाख कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. सध्या आपल्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी आढळत आहेत. दिपाळी जवळ आली आहे, त्यामुळे मार्केटमध्ये गर्दी दिसत आहे. नागरिकांनी गर्दी करुन नये, बाहेर पडतांना योग्यरित्या मास्कचा वापर करावा, सतत हात धुणे किंवा सॅनिटायझ करावे व मार्केटमध्ये खरेदी करतांना सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे बऱ्याच प्रमाणात कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी प्रमाणत आढळत आहेत. ही मोहिम 14 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर व 14 ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात आली. दिपावली हा महत्वपूर्ण सण असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करु नये. खरेदी करतांना सामाजिक अंतराचे पालन करावे.
घाबरुन न जाता काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. घराच्या बाहेर पडतांना मास्कचा वापर करा, सतत साबणाने हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा तसेच सामजिक अंतर ठेवा. कोरोना संसर्गावर अजून लस आली नाही, आली तरी ते शेवटच्या नागरिकापर्यंत पोहचायला 6 महिने ते 1 वर्ष लागू शकते. सध्या तरी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या त्रिसुत्री नियमांचा वापर केला पाहिजे. नागरिकांनी स्वत: बरोबर आपल्या परिवाराची आजबाजुच्या लोकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.