शरयु फौंडेशन तर्फे कोविड19 जनजागृती चित्रकला स्पर्धा

बारामती ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :शरयु फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला  वाहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरयु फौंडेशन मार्फत ऑनलाइन कोविड19 जनजागृती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
   विद्यार्थांनच्या कलागुणांना वाव मिळावा.कोरोना या महामारीचे महत्व कळावे. आणि समाजामध्ये या बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.या मध्ये बारामती,इंदापूर,भिगवण , या भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सहभागी सर्वच विद्यार्थांना ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
   दसऱ्याच्या मुहूर्तावर बारामती तेथील शरयु टोयाटो या शोरूमच्या हॉलमध्ये हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सौ शर्मिला वाहिणीसाहेब पवार यांचे शुभहस्ते घेण्यात आला.
   यावेळी सर्वच विजेत्यांना ट्रॉफी,प्रशस्तीपत्र ,व्हावचर कुपन,चित्रकलेचे कीट विद्यार्थांना   शर्मिला वहिनी पवार यांचे शुभहस्ते देण्यात आले,यावेळी सर्व विजेते, पालक,व शरयु फौडेशन चे सदस्य उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!