सौभाग्य साडी डेपो मुळे 'फलटण ' च्या वैभवात भर: श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर दसऱ्याच्या महूर्तावर' सौभाग्य साडी डेपो' चा शानदार शुभारंभ

सौभाग्य साडी चे उदघाटन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक-निबाळकर ,दीपक चव्हाण व सर्व संचालक (छाया अनिल सावळेपाटील)
बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ) : फलटण तालुक्याचा सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक विकास होत असताना ‘सौभाग्य होलसेल साडी आणि रेडिमेड डेपो’ फलटण च्या कापड व्यवसायात नावीन्य आणून वैभवात भर पडेल  असा विश्वास सातारा जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  यांनी व्यक्त केला आहे.
रविवार दि.25 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभमहूर्तावर’ सौभाग्य होलसेल साडी आणि रेडिमेड डेपो’चा उदघाटन समारंभ फलटण शहरातील लक्ष्मीनगर येथे श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या वेळी निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी फलटण -कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण,नगराध्यक्षा नीता नेवसे ,स्मिता राजेश खरात उपअध्यक्षा राष्ट्रवादी महिला आघाडी फलटण पाटबंधारे विभागाचे माजी अभियंता आप्पासो भोसले,आशोकराव चव्हाण, गणपत कोकरे,राजेश खरात सौभाग्य चे संचालक राहुल चव्हाण,विवेक भोसले,संतोष बांदल,अनिल कोकरे आदी मान्यवर उपस्तीत होते.
गुणवत्ता व दर्जा देत बारामती मधील ग्राहकांचा विश्वास संपादन करून फलटण मध्ये दुसरी शाखा सुरू करून मोठ्या शहरातील सर्व कंपनीचे कपडे तेही किफायतशीर किंमत मध्ये उपलब्ध होत असल्याने मोठ्या शहरात खरेदी करण्यासाठी जाण्याची आवश्यकता आता राहणार नाही त्यामुळे फलटण करांचा वेळ व पैसा वाचणार असल्याचे आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले.
बालकां पासून ते जेष्ठ व्यक्ती पर्यंत  सर्वांचे कपडे,महिलांसाठी साड्या,ड्रेस मटेरियल,लग्न बस्ता साठी खास सोय उपलब्ध आहे देशातील सर्वच नामांकित कंपनीचे कपडे,साड्या  उपलब्ध असून सर्व सामान्य याना परवडेल आशा किमती मध्ये उपलब्ध आहे त्याच प्रमाणे दिवाळी मध्ये प्रत्येक खरेदीवर खास आकर्षक भेट वस्तू  ग्राहकांना मिळणार असल्याचे सौभाग्य होलसेल साडी अँड रेडिमेड डेपो च्या वतीने सांगण्यात आले.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!