शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी श्रीमंत रामराजे शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना : संतोष खटके

गोखळी (प्रतिनिधी ) शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी श्रीमंत रामराजे शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात येत आहे अशी माहीती कंपनीचे मुख्यप्रर्वतक संतोष खटके यांनी सांगितले.

विजयादशमीच्या मुहूर्तावर गोखळी , ता.फलटण , जि. सातारा या कंपनीच्या रजिस्टर्ड माहिती पत्रकाचे औपचारिक अनावरण जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.उषादेवी गावडे यांचे सह प्रमुख मान्यवरांचे हस्ते गोखळी गावाचे ग्रामदौवत श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर ,समोर करण्यात आले. यावेळी श्री. खटके बोलत होते.यावेळी ते पुढे म्हणाले, शेतकर्याना अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी असणारे नवीन तंत्रज्ञान किंवा निविष्ठा यांचा व्यवसाय करून शेतीसाठी गरजेची असणारी आधुनिक आवजारे शेतकरी वर्गाच्या साठी किफायतशीर दराने उपलब्ध करणे, कृषी चिकित्सालयची उभारणी,नवीन बाजारपेठ निर्माण करणे, उत्पादित मालावर प्रक्रीया करून विविध प्रकारचे बाय-प्रोडक्ट बनविणे, शेती माल खरेदी विक्री केंद्र इत्यादी महत्वाचे उद्योगांचा समावेश असणार आहे असे खटके यांनी सांगितले. यावेळी कंपनीचे व्हाईस चेअरमन बजरंग खोमणे, येथे संपन्न झाला.
या वेळी कंपनीचे चेअरमन श्री बजरंग बबनराव खोमणे,सातारा जिल्हा परिषद च्या सदस्य सौ उषादेवी विश्वास गावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सदस्य श्री बबन खोमणे, दुधसागरचे माजी अध्यक्ष दत्तोबा गावडे, पी.आर.अॅग्रोचे संचालक कल्याणराव , पाटील, सानंसा इंड्स्टिजचे संचालक संदीप पारख , शरद विकास सोसायटीचे संचालक
अॅड अजय खोमणे , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माजी सरपंच
मनोज गावडे ,
सगर पतसंस्थेचे सचिव
दत्तात्रय एकाड
, राजु धुमाळ आदी मान्यंवर उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!