महाराष्ट्रातील विविध उत्सवापैकी नवरात्र उत्सव अतिशय वैविध्यपूर्ण साजरा केला जातो.या उत्सवांमध्ये विविध महिला वेगवेगळे उपक्रम घेत असतात. अशा उल्लेखनीय उपक्रमाबद्दल आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर कडून लायनेस क्लब फलटणच्या अध्यक्षा मा.सौ.नीलम विजय लोंढे-पाटील यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नीलामताई यांनी कुटुंबाची आस आणि जनसेवेची कास धरून प्रगतिपथावर सुरू केलेले कार्य उल्लेखनीय आहे. लायनेस क्लब फलटणच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे पेलत, सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी केलेले अतुलनीय कार्य समस्त स्त्री वर्गासाठी प्रेरणादायी आहे .आशा वर्कर, गरजू महिलांना साडी वाटत,मास्क वाटप, वाफारा मशीन वाटप असे विविध उपक्रम तसेच जागतिक कोरोना महामारित केलेले विधेयक उपक्रम निश्चितच प्रेरणा देणारे आहेत.तसेच ज्ञान मंदिरातील किलबिलणाऱ्या चिमणपाखरासाठी पाणी फिल्टर, डिजिटल क्लासरूम, तसेच अंध विद्यार्थ्यांना मदत इ. सुविधा स्वखर्चाने करताना
निलमताई यांची दातृत्वाची विशालता समाजाला दिशादर्शक ठरत आहे. जनसामान्यांसाठी कार्य करण्याची भक्ती आणि तुम्हाला सदैव प्रेरणा देणारे स्त्रीशक्ती यांचा आम्ही आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मानपत्र देऊन नवदुर्गा पुरस्काराने गौरव करीत आहोत. मानवतेच्या आणि कर्तृत्वाच्या ज्ञान मंदिरातील सेवाभावी ठेवणाऱ्या आपल्या कार्यास आई प्रतिष्ठान कडून सलाम आणि आपल्या कार्याचा वटवृक्ष असाच वाढत जावा. यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!! सदर नवदुर्गा मानपत्राचे लेखन उपक्रमशील व आदर्श शिक्षिका, कवयत्री व लेखिका सौ.अंजली गोडसे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. गणेश तांबे, आई प्रतिष्ठानच्या सचिव सौ. जयश्री तांबे, ला.अर्जुनराव घाडगे, श्री. विजय लोंढे- पाटील आई प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री.आनंदगिरी गोसावी श्री.धन्यकुमार तारळकर
सौ.माधवी गोसावी इ. मान्यवर उपस्थित होते.