वाठार निंबाळकर :
महाराष्ट्रातील विविध उत्सवापैकी नवरात्र उत्सव अतिशय वैविध्यपूर्ण साजरा केला जातो.या उत्सवांमध्ये विविध महिला वेगवेगळे उपक्रम घेत असतात. अशा उल्लेखनीय उपक्रमाबद्दल आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर कडून आदरणीय डॉ.अमिता गावडे मॅडम,गटविकास अधिकारी (वर्ग 1) पंचायत समिती फलटण.यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आदरणीय मॅडम यांचा सत्कार श्रीम.योगिता गोरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी “मानपत्र” व “साताऱ्याच्या सहवासात’ हे श्री.सुनील शेडगे लिखित पुस्तक देण्यात आले .
कुटुंबाची आस आणि प्रशासनाची कास धरून प्रगतीपथावर सुरू असलेले डॉ.गावडे मॅडम यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
विस्तृत फलटण तालुक्यातील एक जबाबदार गटविकास अधिकारी म्हणून त्यांचे कार्य मंदिरातील समईच्या ज्योती सारखे प्रखर आणि तेजस्वी आहे.प्रशासकीय अधिकारी म्हणून सर्व विभागांचा समन्वय साधून त्यांनी राबवलेले विधायक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच जागतिक महामारी च्याकाळातील समर्थपणे पेललेली जबाबदारी निश्चितच सर्वांना दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. जनसामान्यांसाठी कार्य करण्याची भक्ती आणि तुम्हाला सदैव प्रेरणा देणारी तुमची स्त्री शक्ती यांचाआदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मानपत्र देऊन आई प्रतिष्ठान कडून गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याचा वटवृक्ष असाच वाढत जावा यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.या सत्काराला उत्तर देताना गटविकास अधिकारी मॅडम यांनी आई प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. तसेच आपल्या फलटण तालुक्याचे नाव चांगल्या कार्याने देशभर व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच नवरात्र उत्सवात केलेला हा सन्मान माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्याबद्दल मी आई प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करते असे त्यांनी गौरवोद्गार काढले. त्याचप्रमाणे सदर मानपत्र लेखन आदर्श व उपक्रमशील शिक्षिका,कवयत्री, लेखिका सौ.अंजली गोडसे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी
मा.श्री रमेश गंबरे
गटशिक्षणाधिकारी प.स.फलटण , आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.गणेश तांबे,आई प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री.दत्तात्रय शिंगटे, श्री.महेंद्र बनकर त्याचप्रमाणे आई प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री.राजेंद्र पवार, श्री.धन्यकुमार तारळकर, श्री. इंद्रजित सस्ते,श्री.निलेश कर्वे ,श्री.प्रेमकुमार कांबळे, इत्यादी उपस्थित होते.मानपत्राचे वाचन श्री.निलेश कर्वे यांनी केले, राजेंद्र पवार यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.