फलटण :महाराष्ट्र शाळा कृती समिती च्या वतीने फलटण तालुक्यातून महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे लिपिक श्री.अमर र.शेंडे यांना सन-२०१९-२०२० चा कृतिशील शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार आज कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष तथा पुणे शिक्षक मतदारसंघा चे मा.आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते व सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.सचिन नलवडे,सातारा जिल्हा शाळा कृती समिती अध्यक्ष श्री.विजय येवले,फलटण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र रेपाळ,माजी अध्यक्ष सुर्यवंशी सर,मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य श्री.खुरंगे सर,माजी प्राचार्य श्री.अर्जुन रूपनवर सर या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या पुरस्कारा बद्दल महात्मा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.सुभाषराव शिंदे व सेक्रेटरी श्री.रविंद्र बेडकिहाळ,मसाप उपाध्यक्ष प्रा.रवींद्र कोकरे , सर्व संस्था पदाधिकारी व शाळेतील शिक्षक यांनी अमर शेंडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.