गोखळी (प्रतिनिधी )पुणे जिल्ह्यातील बारामती येथील अतिवृष्टीने झालेल्या नुसकानीची पहाणी करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंञी रामदास आठवले यांनी आज गुरूवारी गोखळी (फलटण ) येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांची पहाणी केली. आज दुपारी अडीच वाजता गोखळी येथे आगमन झाले. गोखळी येथील गट नंबर 420 मधील सौ. सुवर्णा शांताराम जाधव व गट नंबर 543 मधील हणमंत ज्ञानदेव गावडे यांच्या शेतातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कपाशी पिकाची शेतावर जावून पहाणी केली.फलटण विधानसभा संपर्क प्रमुख पै बजरंग गावडे यांनी फलटण तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले असल्याचे ना.आठवले साहेब यांना सविस्तर माहिती दिली. गोखळी, खटकेवस्ती येथील दौरा आटोपून ना.आठवले यांचे दुपारी तीन वाजता पंढरपूर प्रयाण झाले. ना.रामदास आठवले यांचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच गोखळी निरानदीवरील पुलावर ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सौ.रंजना जाधव यांनी फेटा ,बुके ,देवून स्वागत केले .भारतीय जनता पक्षाचे पै.बजरंग नाना गावडे, पिंटू जगतात, आरपीआय जिल्हा सचिव विजय येवले, तालुका अध्यक्ष संजय निकाळजे,मुन्ना शेख,सतीश अहिवळे शहर अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे ,राजू मारूडा वाई तालुका अध्यक्ष श्रीकांत निकाळजे ,महिला आघाडीच्या विमलताई काकडे,मिनाताई काकडे यांनी ना.आठवले साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
गोखळी येथीलअतिवृष्टीने झालेल्या नुसकानीची पहाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंञी रामदास आठवले यांनी केली
खटकेवस्ती येथे पै .रामचंद्र गावडे, अक्षय गावडे यांनी स्वागत केले. यावेळी प्रांताधिकारी शिवाजीराव जगतात, तहसिलदार संजय यादव,विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक सावंत, ,तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, मंडलकृषी अधिकारी भरत रणवरे, मंडलधिकारी महेन्द्र देवकाते, पोलीस पाटील विकास शिंदे आणि शेतकरी उपस्थित होते.