नात्यातील सोशल डिस्टन्सींग

फेब्रुवारी महिन्यापासून लॉकडाऊन, सॅनिटायझर, कोरोना हे ऐकून ऐकून कंटाळश आला होता. वाटले कधी संपणार हे असले शब्द. पण नंतर एक छानशी कल्पना सुचली. जसे सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींग हे कोरोना घालवण्यासाठी वापरात आणतोय तसेच त्याचा वापर नातेसंबंध जोडण्यात होऊ शकेल कां? आता तुम्ही म्हणाल याचा, या कोरोनाचा आणि या नातेसंबंधाचा काही मेळ तरी आहे कां? पण एक जाणवले की जे सोशल डिस्टंन्सिंग आपण आत्ता पाळतोय हे गेल्या काही वर्षात आपण आपल्या मित्रपरिवार, आपले नातेवाईक यांमध्ये आधीपासूनच पाळतोय. आपण आपल्याच कामात एवढे व्यस्त झलो की, फक्त फोनवरुन खुशाली विचारणे, कार्यक्रमापुरते एकत्रित येणे, तेव्हढ्यापुरते हसणे याव्यतिरिक्त एक आपुलकीची ओढ राहिलीच कुठे आहे? पहिल्यासारखष नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये जाऊन तासन्तास गप्पा मारणे, हसणे, खिदळणे, एकमेकांना मनातील सुख-दु:खे सांगणे हे घडतच नाहीये. जे काही असते ते वरवरचे. 
कोरोनाने एक दाखविले; जगात गरीब, श्रीमंत, जात – पात हा भेदभाव नाही. कोणताही आजार, कोणतीही घटना, कोणालाही, कधीही आपल्या माणसांपासून दूर नेऊ शकतो. गेले कित्येक वर्षे आपल्या माणसांपासून दूर पळणारे आपण आता एकमेकांना भेटण्यासाठी किती व्याकुळ झालो आहोत. एकमेकांशी खूप काही बोलण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. हीच तर संधी आहे नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याची. या कोरोनापासून एक शिकूयात की, आता जरी आपण एकत्र येऊ शकत नसलो तरी सॅनिटायझर ज्याप्रमाणे हात स्वच्छ करतो तसे आपण आपले मन स्वच्छ करुयात. 
सगळे वाद-विवाद, भांडण – तंटे विसरुन भविष्यात पुढे प्रेमाने एकत्र राहण्याचा निर्णय घेऊयात. नात्याची वेल नव्याने फुलवूयात आणि त्यातील गोडवा कायम राखूयात. काय माहिती इथून पुढचे दिवस एक नवीन प्रेरणा घेऊन येतील आपल्या आयुष्यात !


सौ.श्रद्धा वेलणकर, फलटण.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!