भार क्षमतेपेक्षा अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतुक करणाऱ्यांवर होणार विभागीय कारवाई

सातारा दि.22 (जिमाका): ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यावरील अपघातात वाढ होत आहे तसेच रस्त्यांचे नुकसान होत असते. परवाना धारकांच्या ओव्हरलोड करण्याच्या प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी व राज्यातील सर्व प्राधिकरणाच्या कामकाजात समानता राहण्यासाठी तसेच राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या धोरणामध्ये समन्वय राखण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 86 मधील तरतुदीनुसार अतिरिक्त वजनाच्या मालाच्या वाहतुक परवानाधारकांवर खालीलप्रमाणे कारवाई करण्यास मान्यता दिली आहे.

गुन्ह्याचे स्वरुप : सकल भारक्षमतेपेक्षा जी.व्ही. डब्ल्यू अतिरिक्त वजनाच्या मालाची वाहतुक करणे मोटार वाहन प्रकार हलकी मालवाहू वाहने अतिरिक्त भार 5 हजार कि. ग्रँ पर्यंत पहिल्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 10 दिवस परवाना निलंबन व निलंबना ऐवजी सहमत 5 हजार शुल्क रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 20 दिवस परवाना निलंबन किंवा निलंबन ऐवजी सहमत शुल्क रक्कम 10 हजार तिसऱ्या गुन्ह्यासाठी 30 दिवस परवाना निलंबन निलंबन ऐवजी सहमत शुल्क 15 हजार.  भार 5 हजार 1 कि. ग्रँ.  पेक्षा जास्त पहिल्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 10 दिवस परवाना निलंबन व निलंबना ऐवजी सहमत 7 हजार शुल्क रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 20 दिवस परवाना निलंबन किंवा निलंबन ऐवजी सहमत शुल्क रक्कम 14 हजार तिसऱ्या गुन्ह्यासाठी 30 दिवस परवाना निलंबन ऐवजी सहमत शुल्क 21 हजार. 

माध्यम मालवाहू वाहने अतिरिक्त भार 5 हजार कि. ग्रँ. पर्यंत पहिल्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 10 दिवस परवाना निलंबन व निलंबना ऐजवी सहमत 10 हजार शुल्क रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 20 दिवस परवाना निलंबन किंवा निलंबन ऐवजी सहमत शुल्क रक्कम 20 हजार तिसऱ्या गुन्ह्यासाठी 30 दिवस परवाना निलंबन निलंबन ऐवजी सहमत शुल्क 30 हजार.  भार 5 हजार 1 कि. ग्रँ.  पेक्षा जास्त पहिल्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 10 दिवस परवाना निलंबन व निलंबना ऐवजी सहमत 15 हजार शुल्क रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 20 दिवस परवाना निलंबन किंवा निलंबन ऐवजी सहमत शुल्क रक्कम 30 हजार तिसऱ्या गुन्ह्यासाठी 30 दिवस परवाना निलंबन निलंबन ऐवजी सहमत शुल्क 45 हजार. 

जड मालवाहु वाहने अतिरिक्त भार 5 हजार कि. ग्रँ पर्यंत पहिल्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 10 दिवस परवाना निलंबन व निलंबना ऐवजी सहमत 20 हजार शुल्क रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 20 दिवस परवाना निलंबन किंवा निलंबन ऐवजी सहमत शुल्क रक्कम 40 हजार तिसऱ्या गुन्ह्यासाठी 30 दिवस परवाना निलंबन निलंबन ऐवजी सहमत शुल्क 60 हजार.  भार 5 हजार 1 कि. ग्रँ  पेक्षा जास्त पहिल्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 10 दिवस परवाना निलंबन व निलंबना ऐवजी सहमत 25 हजार शुल्क रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी विभागीय कारवाई 20 दिवस परवाना निलंबन किंवा निलंबन ऐवजी सहमत शुल्क रक्कम 50 हजार तिसऱ्या गुन्ह्यासाठी 30 दिवस परवाना निलंबन निलंबन ऐवजी सहमत शुल्क 75 हजार. 

वरील सर्व गुन्हे एकाच कॅलेंडर वर्षातील तसेच एकाच कॅलेंडर वर्षात या स्वरुपाचा चौथा गुन्हा झाल्यास कायद्यातील तरतुदीमधील विहित कार्यपद्धतीचा अवलंब करुन परवाना रद्द करुन सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी कळविले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!