फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचार्यांच्यावतीने दोन पोर्टेबल ऑक्सीजन मशिन्स खरेदी करुन साजरा करण्यात आला. त्याचा वापर संस्थेतील गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, स्कूल कमिटीचे सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे कर्मचारी व कुटुंबातील सदस्य यांच्याकरिता करण्यात येणार आहे.
सदर मशिनचे वितरण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मुधोजी हायस्कूल व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी फलटण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मोहिते यांनी कोविड-19 या या रोगाविषयी सविस्तर माहिती दिली. मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश गोरे यांनी ऑक्सीजन मशीन कशी हाताळावी व ऑक्सी मीटरचा वापर कसा करावा याची माहिती प्रात्यक्षिकासह दिली.
या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, प्रशिक्षण अधिकारी अरविंद सखाराम निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, तुषार नाईक निंबाळकर आदींनी संस्था कर्मचार्यांचे अभिनंदन केले असून यासाठीफलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी परिश्रम घेतले या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.