रब्बी हंगाम प्रकल्प अंतर्गत बियाणे वाटप करताना विभागीय कृषी सह संचालक कोल्हापूर दशरथ तांभाळे,तालुका कृषी अधिकारी रणसिंग व इतर मान्यवर
फलटण :-फरांदवाडी कृषिक्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे काम विभागामध्ये उत्कृष्ठ असून ,शेतकरी कंपन्यांनी शासनाच्या स्मार्ट योजनेत सहभागी होऊन कंपनीचा व शेतकऱ्यांचा उत्कर्ष साधावा असे आवाहन कोल्हापूर विभागीय कृषी सह संचालक दशरथ तांभाळे यांनी केले
कृषी खात्याच्या वतीने कृषिक्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्याने फरांदवाडी तील 25 शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी प्रकल्प बियाणे वाटप व कंपनी भेट प्रसंगी बोलत होते
यावेळी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, कृषी पर्यवेक्षक पालवे, कंपनीच्या चेअरमन सौअर्चना राऊत,व्हा चेअरमन सुभाष भांबुरे,सचिव रणजित नाळे,संचालक ज्ञानेश्वर भोसले,व्यवस्थापक विजय राऊत,कृषी सहाय्यक संजय अभंग,सुरेंद्र भोसले,कपील राऊत,धनंजय घनवट,संतोष टिळेकर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते
कृषिक्रांती कंपनी च्या स्थापनेच्या कालावधी मद्ये आपण येथील शेतकऱ्यांचा उत्साह पहिला असून गत पाचवर्षा मध्ये कंपनीने उल्लेखनीय काम केले असून आता नव्याने येणाऱ्या स्मार्ट योजनेतही कंपनीने मागे राहू नये असे आवाहनही विभागीय कृषी सह संचालक कोल्हापूर दशरथ तांभाळे यांनी केले
रब्बी ज्वारी प्रकल्प बियाणे वाटप या अंतर्गत आपण शेतकऱ्यांना बियाणे वाटप करीत असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन उत्तम प्रतीची ज्वारी पिकवावी असे विभागीय कृषी सह संचालक कोल्हापूर दशरथ तांभाळे यांनी या वेळी सांगितले
कंपनी भेट प्रसंगी विभागीय कृषी सह संचालक कोल्हापूर दशरथ तांभाळे यांचे स्वागत व्हा चेअरमन सुभाष भांबुरे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यावेळी रब्बी ज्वारी प्रकल्प बियाणे वाटपाचा शुभारंभ तांभाळे साहेब यांचे हस्ते करण्यात आला शेवटी आभार कपील राऊत यांनी मानले